Gold Rate : सोन्याच्या भावात तब्बल 24600 रुपयांची वाढ, नवा रेट पाहून सामान्यांना फुटला घाम; किती पैसे द्यावे लागणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. असे असतानाच आता सोन्याचा भाव तब्बल 24600 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.

Gold Rate : सोन्याच्या भावात तब्बल 24600 रुपयांची वाढ, नवा रेट पाहून सामान्यांना फुटला घाम; किती पैसे द्यावे लागणार?
gold rate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 7:16 PM

Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची किंमत सातत्याने वाढत आहे. सध्या सणासुदीच्या काळात या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता विचारली जात आहे. असे असतानाच आता सोन्याचा वाढलेला भाव पाहून सामांन्यांना घाम फुटण्याची वेळ आली आहे. शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी रोजी सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता मकर संक्रांतीच्या अगोदर सोनं दीड लाखांच्या जवळ पोहोचतं की काय? असं विचारलं जात आहे. सोन्यासोबतच चांदीचाही भाव चांगलाच वाढला आहे.

सोने, चांदीचा भाव किती वाढला?

सध्या सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत सोने प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 24600 रुपयांनी वाढले आहे. एका ग्रॅमचा हिशोब करायचा झाल्यास सोन्याचा भाव 2460 रुपयांनी वाढला आहे. लवकरच सोनं आणि चांदी क्रमश: 25000-142000 आणि 232000-255000 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?

शनिवारी 24 कॅरेट सोनया भाव 1,150 रुपयांनी वाढून थेट 1,40,460 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. 24 कॅरेट 100 सोन्याचा भाव 11,500 रुपयांनी वाढून 14,04,600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 24 कॅरेट सोने 14,046 रुपये प्रति 1 ग्रॅम झाले आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,28,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 12,87,500 रुपये झाला आहे. 22 कॅरेट असलेल्या 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम सोन्याच्या भावात क्रमश: 1,050 रुपये आणि 10,500 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीचा भाव किती आहे?

10 जानेवारी रोजी एक किलो चांदीची किंमत तब्बल 2.60 लाख रुपये नोंदवण्यात आली. चांदीच्या भावात 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, सध्याची युद्धजन्य स्थिती आणि जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता लोक सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच सध्या सोन्याचा भाव वाढताना दिसतोय. दरम्यान, आता भविष्यातही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.