AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे फिरवली पाठ, Gold ETF मधील गुंतवणूकही झाली कमी!

आकडेवारीनुसार, गोल्ड ईटीएफमध्ये मे महिन्यात 288 कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. एप्रिलमध्ये ही आकडेवारी 680 कोटी रुपये होती. मार्चमध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमध्ये 662 कोटी रुपये ठेवले होते. फेब्रुवारीत 491 कोटी आणि जानेवारीत 625 कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली होती.

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे फिरवली पाठ, Gold ETF मधील गुंतवणूकही झाली कमी!
जळगावात सोन्याच्या दरात घसरण
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 5:55 PM
Share

मुंबई : मागील महिन्याच्या (मे) तुलनेत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) मधील निव्वळ गुंतवणूक 57 टक्क्यांनी घसरून 288 कोटी रुपये झाली आहे. गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा शेअर बाजाराकडे वळल्यामुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक खाली आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi)च्या आकडेवारीनुसार, Gold ETF गुंतवणूक कमी झाली असली तरी, सोन्याच्या ईटीएफची असेट अंडर मॅनेजमेंट (AMU) 6 टक्क्यांनी वाढून 16,625 कोटी रुपयांवर गेला आहे. एप्रिलच्या शेवटी ते 15,629 कोटी रुपये होते (Gold ETF investment downs 57 percent in may).

आकडेवारीनुसार, गोल्ड ईटीएफमध्ये मे महिन्यात 288 कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. एप्रिलमध्ये ही आकडेवारी 680 कोटी रुपये होती. मार्चमध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमध्ये 662 कोटी रुपये ठेवले होते. फेब्रुवारीत 491 कोटी आणि जानेवारीत 625 कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली होती.

शेअर बाजारातील तेजीमुळे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक झाली कमी!

मॉर्निंगस्टार इंडियाचे रिसर्च असोसिएट डायरेक्टर हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, मे महिन्यात गोल्ड ईटीएफ गुंतवणूकीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजार चांगली कामगिरी करत आहेत आणि गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीचा मोठा हिस्सा इक्विटीकडे वळवत आहेत.

प्रॉफिट बुकिंगचा प्रभाव

त्याशिवाय एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात गोल्ड ईटीएफमधून पैसे काढण्यातही वाढ झाली असून, असे दिसून आले की सोन्याच्या किंमतींच्या नुकत्याच झालेल्या तेजीनंतर काही गुंतवणूकदार नफा कमावत आहेत.

सोन्याचे दर का पडले?

अमेरिकेच्या फेडरल बँकेची पतधोरण बैठक बुधवारी संपणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सतर्क आहेत. तर डॉलरचा सध्याचा भावही एका महिन्यातील उच्चाकांच्या जवळपास आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे सांगितले जाते.

सोने खरेदीसाठी आजपासून हॉलमार्किंग अनिवार्य

येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल.

या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.

(Gold ETF investment downs 57 percent in may)

हेही वाचा :

HDFC बँकेच्या शेअर होल्डर्ससाठी महत्वाची बातमी; 18 जूनला मोठया घोषणेची शक्यता

Gold Price: सोन्याची चमक फिकी पडली, उच्चांकी स्तरापेक्षा 8000 रुपयांनी स्वस्त

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.