Gold Rate : सांगता काय? अवघ्या 10 हजारात सोने; कोणता दागिने तयार करू शकता जाणून घ्या

Cheap Gold Jewellery : सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर सोने गेले आहे. अशात स्वस्त आणि टिकाऊ असा एक पर्याय समोर आला आहे.

Gold Rate : सांगता काय? अवघ्या 10 हजारात सोने; कोणता दागिने तयार करू शकता जाणून घ्या
सोने
| Updated on: Oct 11, 2025 | 10:57 AM

Gold Jewellery : सोन्याच्या भरारीमुळे महिला वर्ग नाराज आहे. सोन्याने 1.25 लाखांपर्यंत भरारी घेतली आहे. वाढत्या किंमतींमुळे सोन्याची दागिने खरेदी करण्याचा मोह महिलांना आवरता घ्यावा लागत आहे. त्यावर काही जणी सोन्याचा मुलामा लावलेले दागिने घालण्याची तयारी करत आहे. पण तसे करण्याची गरज नाही. कारण अवघ्या 10 हजार रुपयांत त्यांना सोने खरेदी करता येईल. दाग-दागिने खरेदी करता येतील.

शुद्ध सोने कोणते?

सर्वात अस्सल सोने 24 कॅरेटचे असते. यामध्ये 99.99 टक्के सोने असते.

त्यानंतर 22 कॅरेट सोने येते. यामध्ये 91.60% सोने आणि इतर धातू असतात

20 कॅरेट सोन्यात 83.30% सोने आणि इतर धातुंचे प्रमाण 16.70% असते

18 कॅरेट सोन्यात सर्वाधिक दागिने तयार होतात. यामध्ये 75 टक्के सोने तर 25 टक्के इतर धातू

काय असते 9 कॅरेट गोल्ड?

आता 9 कॅरेट सोन्याची चर्चा करू. यामध्ये दागदागिने आता केवळ 10 हजार रुपयात मिळू शकतात. सोन्याचा भाव आज एक लाख 20 हजार प्रति 10 ग्रॅमपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अनेकजण 9 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी वळले आहेत. जे ग्राहक महागडी सोन्याची दागिने खरेदी करू शकत नाहीत. तरीही कार्यालयात, सण, समारंभात सोन्याचे दागदागिने त्यांना खरेदी करायचे आहेत. त्यांना 9 कॅरेट सोने हा चांगला पर्याय आहे. 9 कॅरेट सोन्यात 37.5% शुद्ध सोने असते तर 62.5% इतर धातू असतात.

एका तोळ्याची किंमत किती?

आता तुम्हाला वाटत असेल की 10 हजार रुपयाता सोन्याचे दाग दागिने कसे मिळतील? त्यासाठी तुम्हाला 9 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्यावी लागेल. 9 कॅरेट सोन्याची किंमत सध्या जवळपास 40 हजार रुपये तोळा इतके आहे. जर तुम्ही 5 ग्रॅमची ज्लेवरी खरेदी केली तर ती 20 हजार रुपयांमध्ये मिळेल. तर 2.5 ते 3 ग्रॅमचे एअररिंग्स वा अंगठी 10 हजार ते 12 हजार रुपयांदरम्यान मिळेल.

9 कॅरेट सोन्याचे हॉलमार्किंग गरजेची

9 कॅरेट सोन्याचे हॉलमार्किंग या जुलै 2025 पासून बंधनकारक झाली आहे. भारतीय मानक ब्युरोने(BIS) याविषयीचा निर्णय जाहीर केलेला आहे. आता विना हॉलमार्क 9 कॅरेट सोन्याचे दागदागिने विक्री करता येणार नाही. हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी देते.