Gold Latest Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त, पटापट तपासा नवे दर

| Updated on: Jul 12, 2021 | 6:28 PM

चांदी 300 रुपयांनी घसरून 67,611 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. शुक्रवारी सोने 46,965 आणि चांदी 67,911 रुपयांवर बंद झाली.

Gold Latest Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त, पटापट तपासा नवे दर
gold
Follow us on

नवी दिल्लीः Gold Latest Price: रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या कमकुवततेमुळे आज सोने-चांदीच्या किमती खाली आल्यात. आज सोने 169 रुपयांच्या घसरणीसह 46,796 रुपयांवर बंद झाले. त्याचप्रमाणे चांदी 300 रुपयांनी घसरून 67,611 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. शुक्रवारी सोने 46,965 आणि चांदी 67,911 रुपयांवर बंद झाली. (Gold Latest Price: Gold And Silver Cheap On The First Day Of The Week, Check The New Rates)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत सध्या 0.60 टक्के घसरण

जागतिक कारणांमुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर दबाव होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत सध्या 0.60 टक्के घसरण दिसून येत आहे आणि पुन्हा ते 1800 डॉलरच्या खाली पोहोचलेय. चांदी देखील यावेळी खूप दबाव बनवत आहे. सध्या ती 0.86 टक्क्यांच्या खाली औंस 26.00 डॉलरच्या स्तरावर व्यापार करीत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 6 पैशांच्या वाढीसह 74.58 वर बंद झाला. आज सकाळी रुपया 74.49 च्या पातळीवर उघडला गेला. व्यापारादरम्यान तो सर्वात उच्च पातळी 74.40 आणि सर्वात कमी 74.59 च्या पातळीवर पोहोचला होता.

सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Sovereign Gold Bond Scheme चे सबस्क्रिप्शन सोमवारपासून ग्राहकांसाठी खुले होणार आहे. हे बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

रिझर्व्ह बँकेने या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस 4,807 रुपये इतकी निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्‍ड बॉन्‍डचा भाव प्रतिग्रॅम 4757 इतका आहे. सध्या सोने-चांदीचा दर हा सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे सोने खरेदीचे (Gold) नाव काढले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, आता एका सरकारी योजनेच्या माध्यमातून सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.

संबंधित बातम्या

Flipkart चे मूल्य वाढून झाले 2.70 लाख कोटी, जगभरातील गुंतवणूकदारांनी जमवले 25000 कोटी

बँक खात्यातून पैसे चोरल्यास काय करावे, जाणून घ्या संपूर्ण रक्कम परत कशी मिळवायची?

Gold Latest Price: Gold And Silver Cheap On The First Day Of The Week, Check The New Rates