Gold Silver Price : शुक्रवारी सोने पुन्हा तेजीवर स्वार, चांदीची काय आहे चाल, आजचे भाव पाहा झटपट

| Updated on: Jan 13, 2023 | 4:41 PM

Gold Silver Price : शुक्रवारी सोन्याचा भाव पुन्हा वधारला. चांदीची चाल मंदावली काय?

Gold Silver Price : शुक्रवारी सोने पुन्हा तेजीवर स्वार, चांदीची काय आहे चाल, आजचे भाव पाहा झटपट
सोने-चांदीचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय वायदे बाजारावर (Multi Commodity Exchange) दिसून आला. सोन्याच्या भावात सातत्याने वाढ दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोने आणि चांदीने दम दाखवून दिला.
आज बाजार सुरु होताच सोने आणि चांदीत (Gold Silver Price) वृद्धी दिसली. आज 13 जानेवारी, 2023 रोजी सोन्याचा दर 0.10 टक्क्यांनी वाढला. बाजारात सुरुवातीला 24 कॅरेट सोने आज 55,915 रुपये (Gold Price Today) होते. दुपारी 12 वाजता सोन्याच्या किंमती वाढून 55,941 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या.

सोन्याने या आठवड्यात वृद्धी दर कायम ठेवला. तर चांदीचा भावात चढ-उतार होत आहे. सुरुवातीच्या व्यापारी सत्रात चांदीत 0.20 टक्क्यांची घसरण झाली. बाजार सुरु होताच 999 शुद्ध चांदी 68,717 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत होती.  त्यानंतर भावात वाढ झाली नाही.

त्यानंतर चांदीचा भाव पुन्हा घसरला. चांदीचा दर 68,338 रुपये प्रति किलोवर आला. तर मागील व्यापारी सत्रात सोन्यात वाढ नोंदवली गेली होती. सोने 55,875 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदी काल घसरुन 68,643 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आजही घसरणीचा दिवस होता.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीचा दर वधारला. त्यात वृद्धी दिसली. या दोन्ही धातूमध्ये आज 1 टक्क्यांची वाढ झाली. आजच्या सोन्याच्या दरात 1.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. आज सोने 1,896.19 डॉलर प्रति औसवर कारभार करत आहे.

तर चांदीच्या भावात 1.33 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. हा भाव 23.75 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही धातूंची आगेकूच सुरु होती. पण भारतात मात्र चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीत दोनदा घसरण नोंदवण्यात आली.

तर काल सराफा बाजारात सोने-चांदीच्या भावात घसरण दिसून आली. काल 24 कॅरेट सोने 56,082 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर चांदीची किंमत 68,754 रुपये प्रति किलो होती. त्यामुळे काल बाजारात सोने 105 तर चांदी 572 रुपयांनी घसरले.