रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्वप्न होणार का पूर्ण; चक्रावून टाकणारा अंदाज आला!

येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची चांगली संधी आहे. वर्षअखेरीस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता यामुळे सध्याच्या घडीला सोन्यावर दबाव कायम आहे.

रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्वप्न होणार का पूर्ण; चक्रावून टाकणारा अंदाज आला!
gold rate
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 3:35 PM

जागतिक घडामोडी आणि आर्थिक बदल सोन्या-चांदीच्या किमतींवर थेट परिणाम करतात. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात लक्षणीय चढ-उतार जाणवला आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील एक महिनाभर सोन्याच्या किमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची चांगली संधी आहे, असा विश्वास बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या भावाची दिशा कोण ठरवणार?

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण, महागाईचे आकडे, अमेरिकन डॉलरची ताकद आणि जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव या प्रमुख घटकांवर येत्या काळात सोन्याच्या किमती अवलंबून राहतील. कोटक निओचे कमोडिटीज रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक रितेश कुमार साहू यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या घसरणीनंतर स्पॉट गोल्ड सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून सावरण्यात यशस्वी झाला आहे. तरीही एकूण बाजाराचा कल अजूनही कमकुवत दिसतो आहे.”

सध्याची परिस्थिती आणि भविष्यवाणी

सध्या स्पॉट गोल्ड प्रति औंस सुमारे ४,०२२ डॉलर वर व्यवहार करत आहे.

रितेश साहू यांच्या मते:

तात्काळ सपोर्ट लेव्हल: ३,९५० डॉलर

रोध (Resistance) स्तर: ४,२०० डॉलर

जर दर ३,९५० डॉलरच्या खाली गेला तर तो ३,८०० ते ३,४०० डॉलरपर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, ४,२०० डॉलरच्या वर टिकून राहिल्यास सोन्याची किंमत ४,६०० ते ४,८०० डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. अमेरिकन डॉलरची सतत वाढणारी मजबूती, मजबूत रोजगार आकडेवारी आणि वर्षअखेरीस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता यामुळे सध्याच्या घडीला सोन्यावर दबाव कायम आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us