AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold : आत्ताच दागिने खरेदी करा, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या ताजा दर

Gold Rate Latest : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सोने स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोन्याचा ताजा दर, चांदीची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी जाणून घेऊयात.

Gold : आत्ताच दागिने खरेदी करा, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या ताजा दर
Gold Rate latest UpdateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 16, 2026 | 9:58 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठा बदल होताना पहायला मिळत आहे. अशातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. ही घसरण जरी फार मोठी नसली तरी दागिने खरेदी करणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमतीत 200 रुपयांची किरकोळ घट नोंदवली गेली. तसेच देशातील इतरही शहरांमध्ये सोन्याचे दर कमी झालेले आहेत. त्यामुळे ही सोने खरेदीची चांगली संधी आहे.

सोनं किती स्वस्त झालं?

99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर सोमवारी सर्व करांसह 1,59,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तो 200 रुपयांनी घसरून मंगळवारी 1,59,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, चांदीचा दर 2,60,700 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिला आहे. विश्लेषकांच्या मते, जागतिक भू-राजकीय तणावात झालेली घट, देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि रुपयाला मिळालेला आधार यामुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला. मात्र जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारातील घसरण मर्यादित राहिली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर

जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड आणि स्पॉट सिल्व्हरमध्ये तेजी दिसून आली. स्पॉट गोल्डचा दर सुमारे 1 टक्क्यांनी वाढून 4,344.36 अमेरिकी डॉलर प्रति औंसवर पोहोचला, तर चांदीचा दर 70.43 अमेरिकी डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता. मिरे अॅसेट शेअरखानचे कमोडिटी प्रमुख प्रवीण सिंह यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे सोन्याला फायदा होत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी अमेरिका-इराण करारावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी केल्यानंतर तेलाच्या किमती नव्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत.

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे लक्ष

कोटक सिक्युरिटीजच्या कमोडिटी रिसर्च विभागाच्या एव्हीपी कायनात चेनवाला यांनी सांगितले की, व्यापारी अमेरिकेतील महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीच्या घोषणेकडे आणि फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणात्मक निर्णयाकडे लक्ष ठेवून असल्याने सावध भूमिका घेत आहेत. त्यामुळे चांदीचा दर 70.5 डॉलर प्रति औंसच्या आसपास स्थिर राहिला.

एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि चलन संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, बाजारातील लोक अमेरिका-इराण कराराशी संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या घडामोडींचा बुलियन आणि कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना व व्यवहारांवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात पुन्हा बदल होऊ शकतो.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!