Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्या-चांदीचे दर कडाडले, 10 ग्रॅमसाठी आता मोजा इतके रुपये

Gold Rate : सोन्या-चांदीचे दर आज पुन्हा वधारले आहेत.

Gold Rate : सोन्या-चांदीचे दर कडाडले, 10 ग्रॅमसाठी आता मोजा इतके रुपये
सोने-चांदीचा दर किती
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 4:36 PM

नवी दिल्ली : सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे (Gold Price Today) सराफा बाजारात पुन्हा नवीन विक्रम नोंदवल्या जाऊ शकतो. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX Gold Price) सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. 6 जानेवारी 2023 रोजी सोन्याच्या किंमतीत 0.14 टक्क्याची वाढ दिसून आली. याशिवाय चांदीच्या भावातही 0.43 टक्क्यांची वाढ झाली आहे. या घडामोडींचा बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या आठवड्याभरातच सोन्याच्या दरात जवळपास 900 रुपयांपर्यत वाढ झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा भाव 0.14 टक्क्यांनी वधारला. आज सोन्याचा भाव 55368 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. काल व्यापारी सत्राच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. सोन्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

एमसीएक्सवर कामकाज बंद होताना त्यात 0.90 टक्क्यांची घट झाली. त्यानंतर आज व्यापारी सत्राच्या सुरुवातीला दर वाढले. तज्ज्ञांच्या मते, सोने सर्वकालीन उच्चांक नोंदवणार आहे. लवकरच सोने सर्व रेकॉर्ड तोडेल.  त्यामुळे गुंदवणूकदारांची चांदी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने आज घसरणीला ब्रेक लावला. चांदीत आज तेजी दिसून आली. चांदीचा भाव 0.43 टक्क्यांनी वधारला. चांदी आज 68370 रुपये प्रति किलोग्रॅम होती. घसरणीच्या सत्राला ब्रेक लावल्यानंतर चांदीतही भाव वाढीची शक्यता आहे.  सोन्यापेक्षा चांदी जास्त कमाई करुन देईल.

गेल्या व्यापारी सत्रात चांदीच्या भावात 1168 रुपयांची घसरण झाली होती. चांदी गेल्या व्यापारी सत्रात 68,150 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. चांदी लवकरच 90,000 रुपये होईल असा बाजारातील तज्ज्ञांचा दावा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत फारशी तेजी दिसून आली नाही. सोन्याचा भाव 0.83 टक्के घसरला. सोन्याचा दर 1,836.66 डॉलर प्रति औस होता. तर चांदीच्या भावात 1.83 टक्क्यांची घसरण होऊन हा भाव 23.37 डॉलर प्रति औस झाला.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, सोन्यातील भाववाढीचा ट्रेंड कायम आहे. डॉलरमधील कमकुवतपणा त्याला मदत करत आहे. त्यामुळे किंमतीत वाढ दिसून येत आहे. 2023 मध्ये गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळणार आहे. या वर्षाच्या अखेरीस, डिसेंबर महिन्यात सोन्याचा दर 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.