Diwali Gold Rate : दिवाळीतच सोन्याला ‘दर’दरून घाम; चांदीचे निघाले दिवाळे, घसरणीचा 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत; अजून येणार स्वस्ताई?

Gold And Silver Price : अनेक तज्ज्ञांनी जसा पूर्वीच अंदाज वर्तवला होता, तो दिवाळीच्या अखेरच्या टप्प्यात खरा ठरला. सोन्याचा दर घसरला. तर चांदीचे दिवाळे निघाले. दोन्ही धातुनी घसरणीचा 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला.

Diwali Gold Rate : दिवाळीतच सोन्याला दरदरून घाम; चांदीचे निघाले दिवाळे, घसरणीचा 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत; अजून येणार स्वस्ताई?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Oct 23, 2025 | 8:56 AM

Diwali Gold And Silver Rate : ऐन दिवाळीत वधारलेले सोने आणि चांदी लक्ष्मी पूजनानंतर धुमधडाम झाले. सोन्याचा दर घसरला. तर चांदीचे दिवाळी निघाले. या घसरणीने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला. जागतिक बाजारात मंगळवारी सोन्यात 6.3 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली. तर चांदी गडगडली. त्यामुळे ज्यांनी महाग दराने सोने आणि चांदीची खरेदी केली त्यांचा जीव टांगणीला लागला. अर्थात घसरणीचे हे सत्र लवकरच थांबेल आणि दोन्ही धातु पुन्हा मोठी झेप घेतील अशी त्यांना आशा आहे.

मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने एकाच दिवसात 6.3 टक्क्यांनी आपटले. चांदीत 7.1 टक्क्यांनी गडगडली. एकाच दिवसात इतकी मोठी घसरण होण्याचा 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला. मंगळवार नंतर बुधवारी सोने दबावात दिसले. आशियाच्या बाजारात सोन्याचा भाव 2.9 टक्क्यांनी घसरून 4004.26 डॉलर प्रति औंसवर पोहचल्या. तर चांदीत 2 टक्क्यांची घसरण झाली. चांदी 47.89 प्रति औंसवर आली.

सोन्याचा 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत

सोन्याच्या किंमतीत 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण दिसली. दिवाळीनंतर चांदी आपटली. चांदीत फेब्रुवारी 2021 नंतर सर्वात मोठा आपटी बार दिसला. सोने आणि चांदीत धुमधुडाम झाल्याने अनेक ग्राहकांनी बाजाराकडे धाव घेतली. तर सोने आणि चांदी मोड देण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला. सोने आणि चांदीने यंदा 50 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. आता सोन्यातून नफा बुकिंग सुरू झाले आहे. परिणामी सोन्याच्या किंमतीत घसरणीचे वादळ आले आहे.

सोन्याचा भाव धडाम

goodreturns.in नुसार, 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यात 17 ऑक्टोबर रोजी 333 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 1 ग्रॅम सोन्यात अनुक्रमे 191 रुपये, 17, 11 आणि 469 रुपयांची मोठी घसरण झाली. 1 लाख 31 हजार 001 रुपयांहून सोने आज थेट 1 लाख 26 हजार 003 रुपयांपर्यंत घसरले. गुडरिटर्न्सनुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 26 हजार 003 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 15 हजार 540 रुपये असा आहे.

चांदीचे निघाले दिवाळे

चांदीने या वर्षी इतिहास रचला. एक किलो चांदी 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली होती. पण गेल्या आठवड्यापासून चांदीत मोठी घसरण दिसली. 31 हजारांनी चांदीचा भाव आपटला आहे. 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 1 हजार आणि 4 हजारांनी चांदी उतरली. 18 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 13 हजारांची महा घसरण झाली. त्यानंतर अनुक्रमे 8 हजार, 4 हजारांची घसरण नोंदवली गेली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 1,59,900 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरली. 23 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,23,910 रुपये, 23 कॅरेट 1,23,410, 22 कॅरेट सोने 1,13,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 92,930 रुपये, 14 कॅरेट सोने 70,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,60,100 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.