
Diwali 2025 : दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. घरोघरी फराळाचे सुवास दरवळत आहेत. दिवाळी म्हटलं की खरेदीही आलीच. कपडे, फटाके यांसोबतच सणानिमित्र बहुतांश लोकं हे एखादा दागिना घेतात. सोन्याच्या दागिन्यांना कायमच मागणी असते. मात्र सध्या सोन्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सोन्याची किंमत पाहून सर्वांनाचा धक्का बसला आहे. परवा शनिवारी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी एमसीएक्स (MCX) सोन्याचा डिसेंबरचा करार 2 टक्क्यांनी घसरला. 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 27 हजार 320 रुपयांवर आला. अमेरिकेत, सोन्याचे वायदे देखील 2 टक्क्यांहून अधिक घसरून 4 हजार 213.30 डॉलर प्रति औंस झाले. दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत झालेली घसरण प्रामुख्याने अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे आणि अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी झाल्यामुळे झाली आहे. चीनवर 100% टॅरिफ लादणे टिकाऊ ठरणार नाही असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आणि त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यावर नफा कमावण्यास प्रवृत्त होतील असे दिसते.
स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ
मात्र, या वर्षी सोन्यात भयानक तेजी दिसून आली, देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक या सर्व गोष्टींचे यात योगदान आहे. पण आता वातावरण बदलत आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या वर्षी सोन्यात आलेली तेजी ही पारंपारिक कारणांमुळे नव्हे तर ती (वाढ) जागतिक वित्तीय व्यवस्थेत झालेला मोठा बदल दर्शवते.
तणाव कमी झाल्याने सोन्याच्या किमतीवर वाढला दबाव
सोन्याच्या किमती जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या ताकदीवर अवलंबून असतात. मात्र या वर्षी एकंदर अनिश्चिततेचं वातावरण होतं, त्यामुळे किंमत अधिक वाढली. पण आता अनिश्चितता की झाल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे. सेंट्रल बँकेतेर्फे सातत्याने सोनं खरेदी केलं जात आहे. पण गुंतवणूकदार देखील सतर्क आहेत. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, ते विकण्याचा गुंतवणूकदारांचा विचार आहे. सोन्याच गुंतवणूक करणारे, गोल्ड ईटीएफमधून पैसे काढत आहेत.
2026 मध्ये सोन्याच्या दराबाबत ग्रोकला प्रश्न
पुढच्या वर्षी दिवाळीला सोन्याचा भाव किती असेल? काय असेल रेट ? बाबा वांगाच्या भाकिताच्या आधारे ग्रोक यांना विचारण्यात आले की, 2026 मध्ये दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव किती असेल? सध्याच्या काळात 10 ग्रॅमसाठी सोन्याचा भाव हा 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचला आहे. बाबा वांगा यांच्या भाकिताच्या आधारे, ग्रोक म्हणाले की 2026 साली जागतिक आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येण्याची शक्यता असून, त्यामुळे चलन व्यवस्थेत व्यत्यय, बँकिंग संकट आणि बाजारात तरलतेचा अभाव निर्माण होऊ शकतो.
सोन्याच्या किमतींबद्दल काय अनुमान ?
अशा परिस्थितीत, सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणखी वाढू शकते. खरं तर, आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बहुतांश लोक हे सोन्यात गुंतवणूक करतील. आर्थिक संकटाच्या काळात, अलिकडच्या काळात सोन्याच्या किमतीत 20 ते 50 % वाढ झाली आहे. सध्या, बाबा वांगाच्या भाकितानुसार जर 2026 साली मंदी आली तर सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्के आणखी वाढू शकतात. याचा अर्थ असा की पुढील दिवाळीपर्यंत (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026) 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1 लाख 62 हजार 500 ते 1 लाख 82 हजारांच्या दरम्यान पोहोचू शकते. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याच्या वाढत्या मागणीवर आधारित हा अंदाज आहे.