
सोनेच्या किंमतीत यावर्षी 2025 मध्ये तुफान तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर होते. पण आठवड्यातच त्यात मोठा बदल दिसून आला. पाच व्यापारी सत्रात वायदे बाजारात(MCX) 10 ग्रॅम 24 कॅरेट 500 रुपयांच्या जवळपास महाग झाले. पण तरीही ही किंमत कमीच होती. चांदीत मात्र मोठी वाढ झाली. किलोमागे चांदी 1258 रुपये महागली. तर जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच दर प्रति तोळा 1 लाख 14 हजार 3000 रुपयांवर पोहचले. महिन्याभरापूर्वी हा भाव 1,02,5000 रुपये इतका होता. म्हणजे या महिनाभरात सोने जवळपास 12 हजारांनी वधारले.
MCX वर सोन्याचा भाव
मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आला. 3 ऑक्टोबरच्या वायद्यासाठी 24 कॅरेट सोन्याची किंमत शुक्रवारी 53 रुपयांनी वाढली असून हा भाव 1,09,900 रुपये 10 ग्रॅमवर बंद झाल्या आहेत. गेल्या 12 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याचा वायदा 1,09,370 रुपयांवर होता. त्या आधारे एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोने 530 रुपयांनी वधारल्याचे दिसून येते. या काळात सोन्याचा सर्वकालीन उच्चांक 1,10,666 रुपये इतका आहे.
स्थानिक बाजारपेठेत किती किंमत?
स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या ग्राहकांना कडूगोड अनुभव आला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन(ibja)नुसार, 12 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,09,707 रुपये इतका होता. तर शुक्रवारी संध्याकाळी 1,09,775 रुपये इतका होता. म्हणजे आठवड्याची सरासरी काढली तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव केवळ 75 रुपयांनी वधारला आहे. पण पाच दिवसात सोने आणि चांदीत मोठी उलाढाल दिसून आली. ग्राहकांनी तर बाजारपेठेकडे दरवाढीने पाठ फिरवल्याचे दिसते.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. 24 कॅरेट सोने 1,09,780 रुपये, 23 कॅरेट 1,09,340, 22 कॅरेट सोने 1,00,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,330 रुपये, 14 कॅरेट सोने 64,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,28,000 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.