Donald Trump : आता भारताशेजारी युद्धाची धग, अमेरिका या देशावर करणार हल्ला?ट्रम्पचा मोठा इशारा
Bagram Airbase : भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष दक्षिण आशियाने नुकताच पाहिला. जागतिक महासत्ता अमेरिका आता या भागात नवीन युद्ध छेडण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बगराम लष्करी हवाईतळावरुन थेट गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

America warn to Taliban : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानला ठणकावले आहे. अफगाणिस्तानमधील बगराम लष्करी हवाईतळ पुन्हा अमेरिकेला हवा आहे. रशिया नाटो देशांच्या हवाई हद्दीत घुसत आहे. त्यामुळे रशियाला धाकात ठेवण्यासाठी अमेरिकेला हा हवाईतळ हवा आहे. ट्रम्प यांनी हा लष्करी तळ परत न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी तालिबानला दिली आहे. समाज माध्यम प्लॅटफॉर्म ट्रूथ यावर त्यांनी ही धमकीची पोस्ट केली आहे. तालिबानने लागलीच हा तळ अमेरिकेच्या हवाली करावा नसता त्याची किंमत मोजावी अशी मोठी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. येत्या काळात रशियासोबतचे अमेरिकेचे संबंध ही ताणल्या जाणार असे संकेत या धमकीतून मिळत आहेत.
थेट युद्धाची भाषा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला थेट धमकी दिली आहे. बगराम एअरबेस आमच्या हवाली तात्काळ करा. नाहीतर मी काय करतो हे वेगळं सांगायची गरज नाही अशी युद्धाची भाषा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेला काबुलजवळील त्यांचे लष्करी तळही परत हवे आहेत. चीनवर अमेरिकेला नजर ठेवण्यासाठी तो गरजेचा वाटत आहे. पण चीनच्या आडून अमेरिकेला रशियाला धाकात ठेवायचा असल्याचा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे.
भारताच्या शेजारी संघर्ष अटळ
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा समाचार तालिबानने घेतला आहे. अमेरिकाला कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये लष्कर ठेवण्यास मंजूरी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लष्करी तळ आणि हवाई तळ कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला परत देणार नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तालिबानवर मोठे संकट येईल हे स्पष्ट आहे. दोन्ही देशात संघर्ष अटळ असल्याचे दिसून येत आहे.
तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे जाकिर जलाली यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार कोणताही संघर्ष टाळण्यासाठी अमेरिका आणि अफगाणिस्तान सरकारने अगोदर चर्चा करणे गरजेचे आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानचे हितसंबंध जपायला हवेत. दोन्ही देशात आर्थिक आणि राजकीय नाते अधिक घट्ट व्हावे. पण अमेरिकेला लष्करी तळ परत करण्यास अथवा त्यांचे सैनिक अफगाणिस्तानात ठेवण्यास मंजूरी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बगराम एअरबेस का महत्त्वाचा
बगराम एअरबेस हा NATO चे दोन दशकाहून अधिक काळापर्यंत मोठे केंद्र होते. येथे लष्करी हालचाली होत होत्या. या ठिकाणाहून रशिया आणि चीन नाटो देशांच्या टप्प्यात येतात. तालिबानची सत्ता येण्यापूर्वी काही दिवस अगोदर अमेरिकेने हे लष्करी तळ त्यांच्या हाती सोपावले होते.
