AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate today: चांदीला सोन्याचा दर, सोन्याच्या दरात नेमकी किती वाढ? जाणून घ्या आजचे दर

Gold Rates Today : . गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईच्या सोन्यातील (Gold rates today in Mumbai) दरांबाबत अत्यंत अल्पशी घट किंमतीत नोंदवण्यात आली आहे.

Gold Rate today: चांदीला सोन्याचा दर, सोन्याच्या दरात नेमकी किती वाढ? जाणून घ्या आजचे दर
आजचे सोन्या-चांदीचे भाव Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 4:58 PM
Share

मुंबई : सोने चांदीच्या दरात (Gold Silver Rates) सुरु असलेली वाढ कधी कमी होणार, असा प्रश्न लोकांना पडलाय. सोन्या-चांदीच्या दरामध्ये झालेल्या वाढीनं सोनं 51 हजार 500 पर्यंत पोहोचलं आहे, तर चांदीचाही दर हा 67 हजारच्या पार गेलाय. जागतिक घडामोडींची (International Politics) परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईच्या सोन्यातील (Gold rates today in Mumbai) दरांबाबत अत्यंत अल्पशी घट किंमतीत नोंदवण्यात आली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 47,650 रुपयांपर्य़ंत पोहोचली आहे. तर कालच्या तुलनेत 22 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये शंभर रुपयांची घट झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमतही 120 रुपयांनी घटली आहे. 24 कॅरेट सोनं हे 51 हजार 980 रुपयांवर पोहोचलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे 52 हजार रुपयांच्या पार गेलेले सोन्याचे दर हे आता 51 हजारच्या घरात आले आहेत.

गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरांत घट झाली आहे. गुड रीटन्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दरांमध्ये गेल्या तीन दिवसांत पाचशे रुपयांची घट झाली आहे. सोनं या आठड्याच्या तीन दिवसांत जवळपास पाचशे रुपयांनी स्वस्त झालं आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर, प्रति तोळं

  1. मुंबई 47,650
  2. नाशिक 47,700
  3. नागपूर 47,700
  4. पुणे 47,700

24 कॅरेट सोन्याचा दर, प्रति तोळं

  1. मुंबई 51,980
  2. नाशिक 52,030
  3. नागपूर 52,030
  4. पुणे 52,030

चांदीचा दर प्रती किलो

  1. मुंबई 71,100
  2. नाशिक 67,200
  3. नागपूर 67,200
  4. पुणे 67,200

चांदीला सोन्याचा दर!

मंगळवारच्या तुनलेत चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत चांदीचे दर हे 71 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये चांदीचा दर हा 67000 हजारच्या पार गेला आहे. त्यामुळे चांदी खरेदी आता खिशाला कशी परवडणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.

दरम्यान शेअर बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीपासून आश्वासक आकडे दिसून आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. शेअर बाजारात आज 740 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत सेन्सेकमध्ये 1 हजार 194 अंकांची तेजी दिसून आली आहे.

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार , सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला

IPO बाजारात इतना सन्नाटा क्यू है भाई ? तीन महिन्यांत केवळ 4 कंपन्यांची एंट्री

पाहा Video : प्रवीण दरेंकरांविरोधात आप आक्रमक

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.