Gold Rate : अरे देवा.. 1500 ने वाढलं सोनं, चांदी आठवड्याभरात हजारोंनी महाग.. 10 ग्रॅम सोन कितीला ?
या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. 24 -कॅरेट सोन्याच्या दरात एका आठवड्यात अंदाजे 1540 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीचा भाव प्रति किलो 11 हजारांनी वाढला आहे. जागतिक बाजारातील तेजी, डॉलरची हालचाल आणि गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमती वाढतच आहेत.

Gold Silver Price Weekly : सोनं आणि चांदीच्या दरात या आठवड्यात जोरदार वाढ पहायला मिळाली. केवळ पाच दिवसांच्या व्यवहारात, सोन्याची किंमत जवळपास1500 रुपयांनी वाढली आहे. तर चांदीचे दर तब्बल 11 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मजबूत जागतिक बाजारपेठा, डॉलरची हालचाल आणि वाढत्या गुंतवणुकीच्या मागणीमुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. परिणामी, गुंतवणूकदार तसेच सामान्य खरेदीदार ग्राहक मात्र आता सोने आणि चांदीच्या बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
1 आठवड्यात सोन्याच्या दरात 1500 ची वाढ
या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून आली आहे. 3 मे रोजी 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,580 रुपये इतका होता, तो आज, म्हणजेच 9 मे र्यंत वाढून आता प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 53,120 रुपये झालाय. याचा अर्थ असा की केवळ एका आठवड्यात सोनं 1540 रुपयांनी महागलं. जागतिक बाजारातील तेजी, डॉलरची हालचाल आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचं मानलं जातयं. सातत्याने वाढणाऱ्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, सोनं हे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असल्याचे दिसून येत आहे.
Source – Bullions.in
चांदीच्या वाढीचाही वेग
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. 3 मे रोजी 999 शुद्धतेच्या 1 किलो चांदीचा भाव 2 लाख 51 हजार 220 रुपये इतका होता. मात्र आज ( 9 में रोजी) तो दर वाढून 2 लाख 62 हजार 330 रुपये प्रति किलो झाला. केवळ एका आठवड्यात चांदीचे दर 11 हजार रुपये वाढले आहेत. चांदीच्या किमतीतील ही वाढ मजबूत आंतरराष्ट्रीय ;
, वाढती औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या स्वारस्यामुळे झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या किमतींनी गुंतवणूकदार आणि खरेदीदार या दोघांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
Source – Bullions.in
तुमच्या शहरात सोन्याचे दर काय ?
| शहर | 24 कॅरेट | 22 कॅरेट | 18 कॅरेट |
|---|---|---|---|
| चेन्नई | ₹15,437 | ₹14,150 | ₹11,810 |
| मुंबई | ₹15,267 | ₹13,994 | ₹11,450 |
| दिल्ली | ₹15,287 | ₹14,009 | ₹11,465 |
| कोलकाता | ₹15,267 | ₹13,994 | ₹11,450 |
| बंगळुरू | ₹15,267 | ₹13,994 | ₹11,450 |
| हैदराबाद | ₹15,267 | ₹13,994 | ₹11,450 |
| केरळ | ₹15,267 | ₹13,994 | ₹11,450 |
| पुणे | ₹15,267 | ₹13,994 | ₹11,450 |
| बडोदा | ₹15,277 | ₹13,999 | ₹11,460 |
| अहमदाबाद | ₹15,277 | ₹13,999 | ₹11,460 |
तुमच्या शहरात चांदीचे दर काय ?
| शहर | 10 ग्रॅम | 100 ग्रॅम | 1 किलो |
|---|---|---|---|
| चेन्नई | ₹2,800 | ₹28,000 | ₹2,80,000 |
| मुंबई | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |
| दिल्ली | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |
| कोलकाता | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |
| बंगळुरू | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |
| हैदराबाद | ₹2,800 | ₹28,000 | ₹2,80,000 |
| केरळ | ₹2,800 | ₹28,000 | ₹2,80,000 |
| पुणे | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |
| बडोदा | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |
| अहमदाबाद | ₹2,751 | ₹27,510 | ₹2,75,100 |