AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: राज्यात मोठा राजकीय स्फोट? विमानात मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा? उद्धव ठाकरेंच्या उत्तराने शिंदे सेनेच्या पोटात गोळा? ते मोठे संकेत काय?

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis: काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित विमान केला. प्रवासी विमानाने दोघांनी एकत्रित प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यात हितगुजही झाले. या भेटीविषयी यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे.

Uddhav Thackeray: राज्यात मोठा राजकीय स्फोट? विमानात मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा? उद्धव ठाकरेंच्या उत्तराने शिंदे सेनेच्या पोटात गोळा? ते मोठे संकेत काय?
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 11:20 AM
Share

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis: शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित प्रवासी विमानाने नागपूरला पोहचले. त्यावेळी त्यांच्या हितगुज झाले. आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासोबत शिवसेनेचे नेतेही सोबत होते. दोन्ही नेत्यांमध्ये या प्रवासात काय चर्चा झाली याची उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. आज ते खासदार संजय देशमुख यांच्या वाशिम-यवतमाळ संघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच दौरा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाशिम-यवतमाळ मतदारसंघात दौरा होत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांचा दौऱ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. यावेळी कॅमेरा वर गेला तर डोळ्यावर येतो. डोळ्यात पाणी येतं. मग म्हणता उद्धव ठाकरे भारावले, असे कोटी ठाकरे यांनी केली.

शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर आसूड ओढला. शिवसैनिक आणि पत्रकार माझ्यासोबत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यांची वागणूक, भाषा तुम्ही अनुभवत आहात. काही लोकं बुरखे पांघरून आपल्यासोबत राहिली कशी याची लाज वाटते. पत्रकारांना असभ्य वागणूक मिळाली हे आपल्या संस्कृतीत शोभणारे नाही. शिवीगाळ महाराष्ट्राची संस्कृती नाही. गद्दारांच्या मतदारसंघातील मी कट्टर कडवट शिवसैनिकांना भेटणार आहे. शिवैसनिकांना भेटण्यासाठी आणि मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांचा चेहरा पाहून जो उमेदवार दिला त्याची पार्श्वभूमी न पाहता निवडून दिलं त्यांची माफी मागण्यासाठी फिरणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

निधीवरून ठाकरेंचा खासदारांवर निशाणा

तर निधी मिळत नसल्याची ओरड करत सहा खासदार फुटले. त्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. निधी म्हणजे त्यांना फुटीसाठी निधी मिळाला हे त्यांनी मान्य केलं. आमदार फुटले तेव्हा ५० खोके एकदम ओके घोषणा गाजली होती. बैल पोळ्यावेळी बैलावर विदर्भात लिहिलं होतं. आमदारांना ५० कोटी मिळाले होते आता खासदारांना किती मिळाले असतील याची कल्पना करा खासदार निवडून आले तेव्हा मीच दौरा केला होता. माझ्याच शब्दावर खासदार निवडून आले होते. तेव्हा यांना घरी बसवलं होतं. आता बोंबलत आहेत. मी दौरा करून फायदा नाही. पण मी दौरा केला होता म्हणूनच ते निवडून आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

विमान प्रवासात कोणती चर्चा?

शेतकऱ्यांना हमी भाव नाही. पण आमच्या जीवावर निवडून आलेल्या खासदारांना हमी भाव मिळत आहे. आमची मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय चर्चा झाली. येत्या काही दिवसात कळेल. आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत, जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल, असे मोठे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे येत्या दिवसात राज्याच्या राजकारणात बड्या घडामोडी घडणार का? असा सवाल केल्या जात आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी