दणादण का कोसळत आहेत सोन्या-चांदीचे भाव? मोठं कारण आलं समोर; हीच ती संधी…

सोन्या-चांदीच्या दरात सध्या मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेतील महागाई ही प्रमुख कारणे यामागे आहेत. यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमधील दरही घटले आहेत.

दणादण का कोसळत आहेत सोन्या-चांदीचे भाव? मोठं कारण आलं समोर; हीच ती संधी...
jewellery
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 3:43 PM

Gold Silver Price Drop Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण होताना पाहायला मिळत आहे. आजही भारतीय कमोडिटी बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर फ्यूचर चांदीच्या किंमतीच्या तुलनेत 2500 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव घसरून 1.82 लाख रुपये प्रति किलोग्राम झाला आहे. त्याच पद्धतीने सोन्याच्या भावातही घसरण झाली असून सोन्याच्या भावात 700 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण दिसत आहे. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव 1.39 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आला आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी खरेदी करण्याची हीच ती संधी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण

आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळेच भारतीय बाजारातही सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत 0.44 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव घसरून 4,012.62 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर आहे. तसेच वैश्विक बाजारात चांदीच्या किंमती घसरून 52 डॉलर प्रति औंसवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या या घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावरही झाला आहे.

Loading...

म्हणून भाव घसरले

बुलियन मार्केटमध्ये आलेल्या खास घसरणीच्या मागे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आईलची किंमत 2.68 टक्क्याने वाढून 93.94 डॉलर प्रति औंसवर गेली आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय अमेरिकेतील ताज्या महागाईच्या आकड्यांनीही सोने आणि चांदीच्या किंमतीवर मोठा दबाव आला आहे. क्रूड आईलच्या दरात आलेली उसळी आणि अमेरिकेचे आर्थिक आकडे यामुळे धातुच्या किंमती घसरल्या असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मुंबईत भाव काय?

मुंबई आणि कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 141,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 130,140 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे. हाच भाव चेन्नई, पुणे आणि बंगळुरू या बड्या शहरांमध्येही पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा भाव 141,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 130,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबई आणि कोलकात्यात चांदी 1.99 लाख रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

गुंतवणुकदारांना सल्ला काय?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या भावात अचानक बदल झालेला दिसून येत असून त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारही सराफा बाजारावर करडी नजर ठेवून आहेत. जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे बाजारात चढ उतार होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्या चांदीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुमच्या सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us