AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने फोडला घाम ! आजचे दर पाहून… 10 ग्रॅम सोनं…

Gold Rate Today 16 June 2026 Latest News Updates in Marathi : देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीमागचे कारण काय आणि तसेच देशातील दहा प्रमुख शहरांमधील 24-कॅरेट, 22-कॅरेट व 18-कॅरेट सोन्याचे विक्री दर किती ते जाणून घेऊया.

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने फोडला घाम ! आजचे दर पाहून... 10 ग्रॅम सोनं...
16 जून रोजी सोन्याचे दर ?
| Updated on: Jun 16, 2026 | 8:25 AM
Share

Gold Rate Today In India : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष निवळल्याने, युद्धसमाप्ती झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र याचे जागतिक बाजारावरही पजसाद उमटले असून सोन्याचे आण चांदीचे दर वाढल्याने अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतील. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना, दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे; त्याचबरोबर औद्योगिक मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने चांदीच्या दरांनाही चालना मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही धातूंचे भाव धाडकन वर गेले आहेत. सर्वप्रथम सोन्याचा विचार केला तर सलग दुसऱ्या दिवशी त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज 16 जून रोजी देखील सोनं महाग झालं आहे.

गेल्या दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 2460 रुपयांची, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 2260 रुपयांची वाढ झाली आहे. त्यापूर्वी, म्हणजेच 14 जून रोजी दर स्थिर राहण्यापूर्वी सलग दोन दिवसांत 24-कॅरेट सोन्याचे दर 3440 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याचे दर 3150 रुपयांनी वाढले होते. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 10 रुपयांची वाढ झाली असून, 22-कॅरेट सोन्याचे दरही 10 रुपयांनी वाढले आहेत. चांदीचा विचार करायचा झाला तर, दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीचे भाव प्रति किलो 100 रुपयांनी वाढले आहेत.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

देशातील प्रमुख 10 शहरांतील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया…

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 
दिल्ली ₹1,51,690 ₹1,39,060 ₹1,13,810
मुंबई ₹1,51,540 ₹1,38,910 ₹1,13,660
कोलकाता ₹1,51,540 ₹1,38,910 ₹1,13,660
चेन्नई ₹1,53,500 ₹1,40,710 ₹1,18,010
बंगळुरू ₹1,51,540 ₹1,38,910 ₹1,13,660
हैदराबाद ₹1,51,540 ₹1,38,910 ₹1,13,660
लखनऊ ₹1,51,690 ₹1,39,060 ₹1,13,810
पटना ₹1,51,590 ₹1,38,960 ₹1,13,710
जयपुर ₹1,51,690 ₹1,39,060 ₹1,13,810
अहमदाबाद ₹1,51,590 ₹1,38,960 ₹1,13,710

चांदीची चमकही वाढली, दर कितीवर ?

चांदीच्या बाबतीत सांगायचं तर, दोन दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे. या दोन दिवसांत चांदीच्या प्रति किलो दरात 5100 रुपयांची वाढ झाली आहे. या स्थिर कालावधीपूर्वी, 12 जून रोजी एकाच दिवसात त्यात 10, 00 रुपयांची मोठी वाढ झाली होती. आज दिल्लीत प्रति किलो दरात 100 रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव 2.65,100 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकाता यांसारख्या इतर प्रमुख महानगरांमध्येही हाच दर कायम आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा प्रति किलो दर 2, 80, 100 पये इतका असून, चार प्रमुख महानगरांच्या तुलनेत तेथे चांदी सर्वात महाग आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा