Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सराफा बाजारात आज.. जाणून घ्या लेटेस्ट दर
Gold-Silver Rate Today Latest News Updates in Marathi: देशातील सोन्याचे दर आज पुन्हा बदलले असून चांदीच्या दरातही बदल झाला आहे. जागतिक घडामोडींचा देशांतर्गत सोनं- चांदीच्या दरांवर परिणाम होतो. आज दिल्ली, मुंबई, चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांतील भाव किती ते जाणून घेऊया.

सोमवारचा दिवस उजाडताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आला आहे. देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 29 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये दर कमी झाले. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,090 रुपयांवर आला आहे, तर मुंबईत हा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,940 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात 24-कॅरेट सोन्याच्या दरात 2510 रुपयांची, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 2300 रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा व्यवहार प्रति औंस4077.64 डॉलर्स या किमतीवर होत आहे.
‘इंडियन बुलियन असोसिएशन’च्या (IBA) आकडेवारीनुसार, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 10 मेपासून देशातील सोन्याच्या दरात 13,267 रुपयांची घट झाली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि भारताचं वाढतं आयात बिल यांचा संदर्भ देत, परकीय चलन वाचवण्यासाठी एक वर्षभर सोन्याची अनावश्यक खरेदी टाळावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी जनतेला केले होते. त्यानंतर अनेकांनी पंतप्रधानांचं म्हणणं ऐकत सोन खरेदी टाळण्याचा निर्णय घेतला होता.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याची किंमत
राजधानी दिल्लीमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम1,44,090 रुपये तर 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,32,090 रुपयांना मिळत आहे. मुंबई आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,31,940 रुपये असून 24-कॅरेट सोन्यासाठी दर प्रति 10 ग्रॅम 1,43,940 रुपये इतका दर आहे. चेन्नईत सोन्याच दर सर्वाधिक दिसतोय. चेन्नईमध्ये 24-कॅरेट सोनं हे प्रति 10 ग्रॅम 1,45,850रुपयांना आणि 22-कॅरेट सोनं हे प्रति 10 ग्रॅम 1,33,690 रुपयांना मिळतंय. तर पुणे आणि बंगळुरूतील सोन्याचे दरही समोर आलेत. या दोन्ही शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,940 रुपये आहे आणि 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,31,940रुपये इतका आहे.
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) |
| दिल्ली | 132090 | 144090 |
| मुंबई | 131940 | 143940 |
| अहमदाबाद | 131990 | 143990 |
| चेन्नई | 133690 | 145850 |
| कोलकाता | 131940 | 143940 |
| हैदराबाद | 131940 | 143940 |
| जयपुर | 132090 | 144090 |
| भोपाळ | 131990 | 143990 |
| लखनऊ | 132090 | 144090 |
| चंदीगड | 132090 | 144090 |
चांदीच्या दरांच काय ?
सोन्याची किंमत घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहेच. पण दुसरा मौल्यवान धातू चांदीचे दरही खाली आले आहेत. 29 जूनच्या सकाळी चांदीची किंमत घसरून प्रति किलो 2,39,900 रुपये इतकी झाली. गेल्या आठवडाभरात या दरात 10 हजार रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 59.12 डॉलर्स इतका आहे.