Gold Price: सलग दुसऱ्यांदा 5,500 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा दिवाळीपर्यंत काय असेल भाव

| Updated on: Oct 19, 2020 | 1:23 PM

मागील सत्रात सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी घसरला होता तर चांदीमध्ये 0.2 टक्क्यांनी वाढ झाली होती.

1 / 8
भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावांमध्ये (Gold-Silver Price Today) पुन्हा एकदा मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

2 / 8
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबरच्या सोन्याचा वायदा भाव सलग दुसऱ्या दिवशीही घसरला आहे. आज तो 0.22 टक्क्यांनी घसरून 50437 रुपये झाला आहे तर चांदीचा वायदा 0.7 टक्क्यांनी घसरून 61,250 रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

3 / 8
6 ऑगस्टला एमसीएक्सवर प्रति सोन्याची किंमत 10 ग्रॅम 56,015 रुपये होती. याची तुलना 16 ऑक्टोबर 2020च्या किंमतीशी केली असता सोनं तब्बल 5,500 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरलं आहे. मागील सत्रात सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी घसरला होते तर चांदीमध्ये 0.2  टक्क्यांनी वाढ झाली होती.

4 / 8
जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये आज पुन्हा स्थिर राहिले. हा भाव 1,900 डॉलर प्रति औंसवर कायम राहिला.

5 / 8
तर फिजिकल सोन्यामध्ये थोडाफार बदल होत प्रति औंस 1,900.21 डॉलरवर आला आहे. चांदी 0.1 टक्क्यांनी वाढून 24.20 डॉलर प्रति औंस झाली.

6 / 8
जागतिक बाजारात, आज सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकी डॉलरमुळे आज सोन्यावर दबाव होता.

7 / 8
दरम्यान, आता सोन्याचे भाव जरी कमी असले तरी दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.

8 / 8