AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver rate today : सुवर्णनगरीत उलाढाली वाढल्या, चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले!

Gold Silver rate today : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (9 ऑगस्ट) 2 हजार 500 रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली

Gold Silver rate today :  सुवर्णनगरीत उलाढाली वाढल्या, चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले!
Gold and Silver
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 11, 2021 | 11:47 AM
Share

जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात मोठ्या उलाढाली होत आहेत. गेल्या 3 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 200 रुपयांनी खाली आले आहेत. आज, बुधवारी जळगावात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 47 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय 63 हजार रुपये प्रति किलो आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (9 ऑगस्ट) 2 हजार 500 रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सोने मात्र 47 हजार 400 रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. सोन्याचे दर सोमवारी 1 हजार 300 रुपयांनी कमी झाले होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने हा परिणाम होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. सोन्याचे दर अजून 1 हजार रुपयांनी घसरू शकतात. चांदीच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे सोने आणि चांदीत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांनी आता 30 टक्के इतकी खरेदी करायला हरकत नाही, असे सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.

दिल्ली सराफा बाजारतही घसरण 

तिकडे दिल्ली सराफा बाजारतही सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. काल 10 ऑगस्टला दर पुन्हा घसरले. दिल्ली सराफा बाजारात सोने 176 रुपयांनी घसरून 45,110 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाले. सोमवारी सोने 45,286 च्या पातळीवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार ट्रेडिंग सत्रांपासून त्याच्या किमतीवर दबाव आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदी दर

सोने 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदी हिरव्या रंगाच्या निशाणात दिसत आहेत, पण त्यावर अजूनही दबाव आहे, असं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या 

सुवर्णनगरी जळगावात सोन्या-चांदीचे दर घसरले, ग्राहकांची दुकांनामध्ये खरेदीसाठी गर्दी, तोळ्याचा भाव काय?

कोरोनाच्या संकटात नोकरी गमावली, तर हा व्यवसाय सुरू करा आणि दरमहा 10 लाख कमवा

Gold Silver Price: सोने 5 महिन्यांत सर्वात स्वस्त, आज पुन्हा घसरले, जाणून घ्या

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर