सुवर्णनगरी जळगावात सोन्या-चांदीचे दर घसरले, ग्राहकांची दुकांनामध्ये खरेदीसाठी गर्दी, तोळ्याचा भाव काय?

सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या 2 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 300 रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं.

सुवर्णनगरी जळगावात सोन्या-चांदीचे दर घसरले, ग्राहकांची दुकांनामध्ये खरेदीसाठी गर्दी, तोळ्याचा भाव काय?
जळगावात सोन्याच्या दरात घसरण

जळगाव : सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या 2 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 300 रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं.

सोने चांदीचे दर घसरले

सोने व चांदी या दोन्ही धातूंचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या 3 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 200 रुपयांनी खाली आले आहेत. आज, बुधवारी जळगावात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 47 हजार 700 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय 63 हजार रुपये प्रति किलो आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (9 ऑगस्ट) 2 हजार 500 रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सोने मात्र 47 हजार 400 रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. सोन्याचे दर सोमवारी 1 हजार 300 रुपयांनी कमी झाले होते.

सोने-चांदीचे दर घसरण्याचं कारण काय?

आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने हा परिणाम होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. सोन्याचे दर अजून 1 हजार रुपयांनी घसरू शकतात. चांदीच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे सोने व चांदीत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांनी आता 30 टक्के इतकी खरेदी करायला हरकत नाही, असे सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले.

(Gold and silver prices Down in Suvarnagari Jalgaon)

हे ही वाचा :

कोरोनाच्या संकटात नोकरी गमावली, तर हा व्यवसाय सुरू करा आणि दरमहा 10 लाख कमवा

Gold Silver Price: सोने 5 महिन्यांत सर्वात स्वस्त, आज पुन्हा घसरले, जाणून घ्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI