Gold Silver Price: सोने 5 महिन्यांत सर्वात स्वस्त, आज पुन्हा घसरले, जाणून घ्या

मागील ट्रेडिंग सत्रात ती 62,663 रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने सध्या 5 डॉलरच्या वाढीसह 1732 डॉलरच्या पातळीवर आणि चांदी अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह 23.40 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करत आहे.

Gold Silver Price: सोने 5 महिन्यांत सर्वात स्वस्त, आज पुन्हा घसरले, जाणून घ्या
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः Gold Silver Price: सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. आज त्याची किंमत पुन्हा घसरली. दिल्ली सराफा बाजारात सोने 176 रुपयांनी घसरून 45,110 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाले. सोमवारी सोने 45,286 च्या पातळीवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार ट्रेडिंग सत्रांपासून त्याच्या किमतीवर दबाव आहे.

आज चांदी 898 रुपयांनी घसरून 61,765 रुपये

दिल्ली सराफा बाजारात आज चांदी 898 रुपयांनी घसरून 61,765 रुपये प्रति किलोवर बंद झाली. यापूर्वी मागील ट्रेडिंग सत्रात ती 62,663 रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने सध्या 5 डॉलरच्या वाढीसह 1732 डॉलरच्या पातळीवर आणि चांदी अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह 23.40 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यापार करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदी हिरव्या रंगाच्या निशाणात

एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल यांनी सांगितले की, यावेळी सोने 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेय. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदी हिरव्या रंगाच्या निशाणात दिसत आहेत, पण त्यावर अजूनही दबाव आहे.

ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.37 टक्के

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.37 टक्के प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह व्यापार करीत आहे. त्याचबरोबर सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदीमध्ये प्रति किलो 0.84 टक्के वाढ झालीय. शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 1,000 आणि चांदीचे दर 2,000 रुपये प्रति किलोने कमी झाले, तर सोमवारी ते अनुक्रमे 700 आणि 2,250 रुपयांनी कमी झाले.

सॉवरेन गोल्ड बाँडमधून सरकारने इतके कोटी उभारले

2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू झाल्यापासून सरकारने या योजनेतून 31,290 कोटी रुपये उभारलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेला ही माहिती दिली. सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, सार्वभौम सुवर्ण बाँड योजना भारत सरकारने 5 नोव्हेंबर 2015 रोजी अधिसूचित केली होती, पर्यायी आर्थिक मालमत्ता विकसित करण्यासाठी आणि भौतिक सोने खरेदी किंवा धारण करण्यासाठी पर्याय म्हणून ती खूप फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या

PM Kisan : पीएम किसान योजनेचे 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा

Success Story: अवघ्या 99 रुपयांत पँट विकणाऱ्या किशोर बियाणींनी 9000 कोटीचे पँटालून कसे बनवले? वाचा सविस्तर

Gold Silver Price: Gold is the cheapest in 5 months, fell again today, find out

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI