AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: अवघ्या 99 रुपयांत पँट विकणाऱ्या किशोर बियाणींनी 9000 कोटीचे पँटालून कसे बनवले? वाचा सविस्तर

रिटेल किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या किशोर बियाणी यांनी शॉपिंग सोपे करून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. किशोर बियाणी यांनी फ्यूचर ग्रुपच्या फ्युचर रिटेलच्या माध्यमातून किरकोळ व्यवसायाचे संपूर्ण साम्राज्य निर्माण केले.

Success Story: अवघ्या 99 रुपयांत पँट विकणाऱ्या किशोर बियाणींनी 9000 कोटीचे पँटालून कसे बनवले? वाचा सविस्तर
Retail King Kishore Biyani
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 9:08 AM
Share

नवी दिल्लीः वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालणं हा लोकांसाठी एक ट्रेंडच झालाय. परंतु लोकांसाठी फॅशनेबल कपडे बनवणाऱ्या प्रसिद्ध बँड असलेल्या पँटालूनच्या मालकांबद्दल तुम्हाला माहीत आहे का?  लोकांसाठी फॅशनेबल कपडे बनवणाऱ्या कंपनीचे मालक किशोर बियाणी (kishor biyani) अतिशय साधे जीवन जगतात. किशोर बियाणी अनेक ब्रँडचे मालक आहेत, पण तरीही ते आपल्या जीवनात अतिशय साधेपणा अंगीकारत आहेत. किशोर बियाणी हे असेच एक नाव आहे, जे भारतातील आधुनिक रिटेल क्षेत्राचे अग्रणी म्हणून ओळखले जातात.

किशोर बियाणी यांनी फ्यूचर ग्रुपच्या माध्यमातून व्यवसायाचे जाळे उभारले

रिटेल किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या किशोर बियाणी यांनी शॉपिंग सोपे करून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. किशोर बियाणी यांनी फ्यूचर ग्रुपच्या फ्युचर रिटेलच्या माध्यमातून किरकोळ व्यवसायाचे संपूर्ण साम्राज्य निर्माण केले. किशोर बियाणी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1961 रोजी मुंबईस्थित कापड व्यापाऱ्याच्या घरात झाला. त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात खूप रस दाखवला. 1987 मध्ये किशोर बियाणी यांनी आपल्या कपड्यांचा व्यवसाय रेडिमेड कपड्यांकडे वळवला.

वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी तयार केला ब्रँड

सुरुवातीला किशोर बियाणींना स्टोन वॉश फॅब्रिक व्यवसायात बरेच यश मिळाले, ज्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. किशोर बियाणी त्यावेळी काहीतरी नवीन करण्याची संधी शोधत होते. किशोर यांना असे काहीतरी करायचे होते, ज्याद्वारे देशभरातील जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधता येईल. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी Menzwear प्रायव्हेट लिमिटेड सुरू केले. व्यवसाय सुरू केल्यानंतर किशोर बियाणी यांनी वस्त्रोद्योग समजून घेण्यासाठी पाच वर्षे घालवली. मग किशोर बियाणी यांनी रेडिमेड कपड्यांचा निर्माता म्हणून व्यवसाय सुरू केला आणि दोन ब्रॅण्ड बनवले.

…अन् पँटालूनचा जन्म झाला

अल्पावधीतच किशोर बियाणींनी आपल्या ब्रँडचे नाव बदलून पँटालून ठेवले. वर्ष 1992 मध्ये किशोर बियाणी यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये पँटालून लिस्टिंग केले, जेणेकरून पैसे जमा करता येईल. यानंतर किशोर बियाणीने मागे वळून पाहिले नाही, कारण त्यांनी किरकोळ व्यवसायाची संपूर्ण इकोसिस्टम तयार केली. किशोर बियाणींनी कपड्यांच्या व्यवसायात एक क्रांतिकारी बदल घडवून आणला. नव्या युगात याला फॅशनचे नाव देण्यात आले. लोक टेलरकडे जाण्याऐवजी रेडिमेड कपडे खरेदी करण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये जाऊ लागले.

फ्युचर ग्रुप स्टोअर्स

फ्युचर ग्रुपने 2001 मध्ये बिग बाजारचे पहिले स्टोअर उघडले. 2006 पर्यंत त्यांची संख्या 56 पर्यंत वाढली आणि 2008 पर्यंत त्यांची संख्या 116 वर गेली. 2008 च्या मंदीचा कंपनीवर वाईट परिणाम झाला असला तरी कंपनी वाढतच राहिली. दरवर्षी नवीन दुकाने उघडत राहिली आणि 2019 पर्यंत एकूण 295 स्टोअर्स होती. किशोर बियाणी यांनी संपूर्ण बाजार भारतीय मध्यमवर्गाला एका छताखाली दिला. बिग बाजार भारताचा वॉलमार्ट म्हणूनही ओळखला जातो.

संबंधित बातम्या

Share Market Updates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात वाढ, सेन्सेक्स 54400 च्या पुढे

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, व्यापाऱ्यांचा मोठा विजय

Success Story: How did Kishore Biyani, who sells pant for Rs 99, make a pantalon worth Rs 9000 crore? Read detailed

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.