Gold Silver Price Today: आयात शुल्कामुळे सोने दुडूदुडू पळाले, चांदीही सावरली, काय आहे आजचे भाव ?

| Updated on: Jul 05, 2022 | 3:19 PM

Gold Price Today: सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत आज थोडी फार वाढ झालेली दिसून आली. तर घसरणीच्या सत्रातून चांदी सावरली आहे.

Gold Silver Price Today: आयात शुल्कामुळे सोने दुडूदुडू पळाले, चांदीही सावरली, काय आहे आजचे भाव ?
आजचे सोने चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

सरकारने भारतीयांचे सुवर्णप्रेम कमी करण्यासाठी सोन्याच्या आयतीवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. सोन्यावर 5 टक्के आयात शुल्क (Import Tax) लावले आहे. सोन्यावर यापूर्वी 7.5 टक्के आयात शुल्क होते. आता त्यात वाढ होऊन ते 12.5 टक्के होणार आहे. या घडामोडींचा परिणाम बाजारात दिसून आला. सोन्याच्या भावाने उसळी घेतली. या आठवड्याच्या दुस-या दिवशी , 5 जुलै रोजी सकाळी सोन्याच्या किंमतीत(Gold Price) थोडीफार वाढ दिसून आली. तर सततच्या घसरणीच्या सत्राला चांदीने अखेर ब्रेक लावला. बाजारात आज चांदी सावरली. शुद्ध सोन्याचे भाव आज 52 हजारांच्या पुढे तर शुद्ध चांदीची किंमत(Silver Price) आज 58 हजार रुपये प्रति किलो होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ibjarates.com वर आजचे सोन्या-चांदीचे भाव दिले आहेत. त्यानुसार, 5 जुलै रोजी सकाळी 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने 50 हजारांच्या तर चांदी 60 हजार रुपयांच्या घरात विक्री होत होती.

ibjarates.com नुसार, 999 शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. हे सोने प्रति 10 ग्रॅम 51,467 रुपये दर आहे. तर 999 शुद्ध असलेल्या चांदीचा भाव कमी झाला आहे. गेल्यावेळी एक किलो चांदीचा भाव 65,825 रुपये होतो, तो आज 66,468 रुपये प्रति किलो आहे.

काय आहे आजचे सोन्याचे भाव

999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी 52,218 रुपये होता. त्यात 193 रुपयांची वाढ होऊन आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 52411 झाला. तर 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी 52009 रुपये होता. त्यामध्ये 192 रुपयांची वाढ होऊन आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 52201 रुपये झाला. तर 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी 47832 रुपये होता. त्यामध्ये 176 रुपयांची वाढ होऊन आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 48008 रुपये झाला.750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी 39164 रुपये होता. त्यात 144 रुपयांची वाढ होऊन आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 39308 रुपये झाला.

हे सुद्धा वाचा

सुवर्ण कर्जाचा पर्याय

सुवर्ण कर्ज (Gold Loan) हा तुमच्यासाठी एक महत्वाचा पर्याय उपलब्ध आहे. गोल्ड लोनवरील व्याजदर(Interest Rate) ही कमी असते आणि बँका (Bank) हे कर्ज ही लवकरात लवकर मंजूर करतात. कर्जाची रक्कम ही लागलीच तुमच्या खात्यात जमा होते. सोन्याची गुणवत्ता तपासून (Gold quality) आणि सोन्याचे वजन (Gold Weight) केल्यानंतर तुमचे कर्ज त्वरीत मंजूर करण्यात येते. त्यानंतर काही कागदपत्रांची पुर्तता करुन आणि केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करुन कर्ज रक्कम खात्यावर जमा करण्यात येते.कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा. सोन्याची गुणवत्ता आणि वजनावर कर्जाची प्रक्रिया अवलंबून असते,बँका सुवर्ण कर्ज कमी व्याजदरावर देतात, एकूण किंमतीच्या केवळ 65 ते 75 टक्के कर्ज मिळते. कर्जाची परतफेड चुकल्यास अतिरिक्त भूर्दंड पडतो.कर्ज फेड न जमल्यास बँक सोन्याची विक्री करु शकते.