Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

| Updated on: Dec 22, 2020 | 4:43 PM

गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोन्या- चांदीच्या दरांनी काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उसळी घेतली होती. परंतु आज पुन्हा एकदा या दरांमध्ये घट झाली आहे.

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर
Follow us on

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver Price) चढ-उतार सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरांनी काल (सोमवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उसळी घेतली होती. परंतु आज पुन्हा एकदा या दरांमध्ये घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत (प्रति तोळा) 243 रुपयांनी घट झाली असून सोन्याचा दर 49,653 रुपये प्रति 10 ग्रॅम असा झाला आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 216 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आजचा चांदीचा दर 67,177 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. (Gold-silver prices fall again, find out today’s rates)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आण चांदीच्या दरात सोमवारी मोठी तेजी पाहायला मिळाली होती. परदेशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सुरक्षित पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळवल्याचे सांगितले जाते. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती सापडल्याने तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्याचाही सोन्या-चांदीच्या जागतिक बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.

आठ महिन्यांत सोन्याची आयात घटली

यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात सोन्याची आयात 40 टक्क्यांनी घटून 12.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही आयात घटल्याचे सांगितले जाते. सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्याच्या तुटीवर परिणाम होतो. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये भारतामध्ये 20.6 अब्ज डॉलर्स इतक्या मुल्याच्या सोन्याची आयात झाली होती.

भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो

भारत सोन्याचा सर्वात मोठा आयात करणारा देश आहे. दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुख्यतः सोन्याची आयात केली जाते. वर्षाकाठी 800 ते 900 टन सोन्याची आयात होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 44 टक्क्यांनी घसरून 14.30 अब्ज डॉलरवर गेली आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशातील सोन्याची आयात 40 टक्क्यांनी घसरून 12.3 अब्ज डॉलरवर गेलीय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयात कमी झालीय. चालू खात्यातील तुटीवर सोन्याच्या आयातीचा परिणाम होत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या मौल्यवान धातूची आयात मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये याच काळात 20.6 अब्ज डॉलर्स होती. नोव्हेंबर महिन्यात वार्षिक आधारावर आयात 2.65 टक्क्यांनी वाढून 3 अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत चांदीची आयातही 65.7 टक्क्यांनी घटून 75.2 कोटी डॉलर्सवर आली आहे.

संबंधित बातम्या:

Gold Price Today: कोरोनाच्या नव्या ट्रेन्सनं सोन्याला झळाळी; जाणून घ्या तोळ्याचा भाव

कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे भांडवली बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपये बुडाले

Gold Price : सोने खरेदी करण्याची हीच ती वेळ?; सोनं 56000 पर्यंत जाण्याची शक्यता

आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम

(Gold-silver prices fall again, find out today’s rates)