
Gold-Silver Bank Locker Rules: सोन्याचे आणि चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. या दरवाढीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने खरंच संपूर्ण सुरक्षित आहे का ? सर्वसाधारण धारणा अशी आहे की बँक लॉकर सर्वात सुरक्षित पर्याय आहे. परंतू सत्य परस्थिती अशी आहे की जर बँक लॉकरमधून सोने आणि चांदीची चोरी झाली, किंवा आग लागली वा कोणा कर्मचाऱ्याच्या हलगर्जीने नुकसान झाले, तर ग्राहकाला संपूर्ण नुकसान भरपाई मिळते का ? या संदर्भात आरबीआयचे काय म्हणणे आहे पाहूयात..
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची संपूर्ण जबाबदारी बँकेची असत नाही. जर आग, चोरी, दरोडा आणि इमारती कोसळणे वा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीने काही सामान गायब झाले तर बँकेची जबाबदारी लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या केवळ १०० पट मर्यादित असते. उदाहरणार्थ जर तुम्ही बँकेच्या लॉकरचे वार्षिक भाडे २००० रुपये देत आहात, तर बँक कमाल जबाबदारी म्हणून अशा वेळी जास्तीत जास्त २ लाख रुपये भरपाई देऊ शकते.
अलिकडच्या महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमत वाढ झाली आहे. अशात अनेकांनी वर्षांपूर्वी खरेदी केलेले सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले आहे. त्यांच्यासाठी ही जोखीम वाढली आहे. लॉकरचे भाडे तेवढेच असले तरी सोन्याची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. अशा स्थितीत नुकसान झाल्यास बँकच्या कडून मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी ठरु शकते.
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या सोने वा मौल्यवान वस्तूंचा कोणताही विमा काढत नाही.आरबीआयच्या नियमानुसार बँकेला लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची माहिती नसते. यामुळे ते याचा विमा उतरवत नाहीत. एवढेच काय बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या लॉकरमधील साहित्याच्या साठी विमा प्रोडक्ट ऑफर करण्याची परवानगी देखील नसते.
तज्ज्ञांच्या मते ग्राहकांना स्वत: त्यांच्या दागिन्यांचा विमा करायला हवा. जनरल इंश्योरेंस कंपन्या ज्वेलरीचा विमा उतरवून देतात. चोरी, आग, दरोडा आणि नैसर्गिक संकटात विम्याचे कवच मिळते. अनेक होम इंश्योरेंस पॉलिसी व्हॅल्युएबल्स एण्ड ज्वेलरी ऐड ऑनद्वारे बँकेत ठेवलेल्या सोन्याला देखील विमा कवच पुरवतात.
जर पुर, भूकंप,वीज कोसळणे वा अन्य नैसर्गिक संकटात नुकसान झाले तर बँकेची कोणतीही जबाबदारी रहात नाही. अशा प्रकरणात संपूर्ण जोखीम ग्राहकांची असते. मात्र, बँकांना त्यांची लॉकर सिस्टीम आणि इमारती सुरक्षा करण्याची तजवीत करावी लागते. परंतू नुकसान भरपाई ग्राहकांना अशा प्रकरणात मिळत नाही.