AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना चेहऱ्यावर तणाव, ना युद्धाचे टेन्शन, तेहराणच्या रस्त्यावर फिरताना दिसले इराणचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिका आणि इस्राईलच्या रडारवर असलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी हे इराणच्या रस्त्यावर कुद्स दिवस साजरा करताना दिसले आहेत.

ना चेहऱ्यावर तणाव, ना युद्धाचे टेन्शन, तेहराणच्या रस्त्यावर फिरताना दिसले इराणचे राष्ट्राध्यक्ष
Iran's President spotted strolling in Tehran
| Updated on: Mar 13, 2026 | 11:08 PM
Share

अमेरिका आणि इस्राईलने इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला, त्यानंतर लागलीच त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक टॉपच्या अधिकाऱ्यांची हत्या केली. या युद्धाला १४ दिवस पूर्ण झाले असताना अमेरिका आणि इस्राईलकडून हल्ल्यांचा धोका असतानाही इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि धार्मिक संस्थेचे ( होजा ) प्रमुख आयतुल्लाह अराफी जनतेत फिरताना दिसले आहेत. हे सर्व नेते एकदम प्रसन्नपणे निर्विकार दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ना चेहऱ्यावर कोणता तणाव, ना युद्धाचे टेन्शन होते. हे सर्व नेते कर्द्स डे साजरा करण्याच्या निमित्ताने जनतेत मिसळलेले दिसले. अली लारीजानी यांनी हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अमेरिकन हल्ल्या संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

मेहर न्यूजच्या नुसार रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी इराणी कुद्स दिवस साजरा करण्यासाठी हे नेते रस्त्यावर उतरले होते. यावेळी लोकांनी पॅलेस्टाईनबद्दल एकजुटता दाखवली. सिनियर नेते देखील या दरम्यान एंघेलाब स्ट्रीटवर नजरेस पडले. जेथे हजारोच्या संख्येने लोक जमले होते. अली लारिजानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीलीय त्यात ते म्हणतात की आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हौतात्म्याच्या १३ दिवशी रस्त्यांवर इराणीची जनता बाहेर पडली आहे.

कुद्स दिवस का साजरा करतात ?

पॅलेस्टाईन नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या संदर्भात दरवर्षी रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी इराण आणि अन्य मुस्लीम देशात हा दिवस साजरा केला जातो. या दरम्यान लोक रस्त्यावर बाहेर पडतात आणि पॅलेस्टाईनमध्ये मारले गेलेल्या नागरिकांच्या प्रति शोक व्यक्त करतात.

इराणमध्ये ज्यू सरकारच्या विरोधात रॅली देखील आयोजित केल्या जातात. आधी इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई यांचे संबोधन देखील व्हायचे. मात्र, यावेळी इराणच्या सुप्रीम लीडर यांचा हल्ल्या मृत्यू झाल्याने त्यांच्या विना हा दिवस साजरा करण्यात आला.

येथे पाहा पोस्ट –

US-इस्राईलच्या रडारवर पझेश्कियान-लारिजानी

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान आणि राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च परिषदेचे सचिव अली लारिजानी इस्राईल आणि अमेरिकेच्या रडारवर आहेत. दोघांना मारण्यासाठी अमेरिका आणि इस्राईल स्ट्राईक केलेल्या आहेत. मात्र, आतापर्यंत हे दोन्ही नेते अमेरिकेच्या हल्ल्यातून वाचले आहेत.

मसूद पझेश्कियान आणि अली लारिजानी हे बंकरमध्ये राहात असल्याच्या बातम्याही इराणमधून आल्या होत्या. परंतू युद्धाच्या १४ व्या दिवशी दोन्ही नेत्यांनी रस्त्यावर उतरुन निर्धाराने मैदानात उतरुन जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

इराणच्या सुप्रीम लीडर नंतर राष्ट्राध्यक्ष आणि सर्वोच्च परिषदेचे सचिवांना सर्वात जास्त पॉवरफुल मानले जाते. अली लारिजानी यांना इराणचे दिवंगत सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेईल यांच्या जवळचे मानले जाते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल