AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये केवळ ती एकटीच, महिलेने सांगितले प्रवासाचे खरे कारण, सर्वच हैराण – Video

इराण युद्धानंतर वातावरणात तणाव असताना एका महिलेने दुबईची फ्लाईट पकडली. मात्र, संपूर्ण विमानात ती एकटीच होती. तिने तिच्या प्रवासाचे कारण आणि आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दुबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये केवळ ती एकटीच, महिलेने सांगितले प्रवासाचे खरे कारण, सर्वच हैराण - Video
dubai
| Updated on: Mar 13, 2026 | 8:59 PM
Share

इराण युद्धामुळे अत्यंत सुरक्षित अशा दुबईतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लोक धडपडत असताना या काळात एका महिलेने दुबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले खरे, परंतू जेव्हा ती प्रत्यक्षात विमानात बसली तेव्हा संपूर्ण विमानात ती एकटीच प्रवासी होती. हा विचित्र अनुभव या महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. युद्धाच्या काळात या महिलेचे धाडस पाहून नेटकरी हैराण झाले आहे.

दुबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एकटीच

या महिला प्रवाशाचे नाव Marina Gilla आहे. ती लातव्हिया (Latvia) येथील रहिवासी असून पेशाने एक इंग्रजी शिक्षिका आहे. मारिना हीने सांगितले की Riga ते दुबई अशा फ्लाईटमध्ये प्रवास करत होती. परंतू त्या दिवशी विमानात तिच्याशिवाय अन्य कोणीच नव्हते.

मारिना हीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितले की ८ मार्च २०२६ रोजी जेव्हा तिने दुबईसाठी उड्डाण घेतले तेव्हा विमानात ती एकटीच प्रवासी होती. तिने लिहीलंय की हा अनुभव खूपच अजब होता. कारण सर्वसाधारणपणे एखाद्या कमर्शियल फ्लाईटमध्ये प्रवासी नाहीत असे कधी घडत नाही.

दुबईला का जात होती ?

मारिना हीने लिहिलंय की त्यांना दुबईत एका चांगल्या नोकरीचा प्रस्ताव मिळाला होता. त्यामुळे तिने या युद्धजन्य स्थितीत दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. मारिना यांनी म्हटलंय की त्यांना आशा होती की फ्लाईट रद्द होणार नाही आणि ती सुरक्षितपणे संयुक्त अरब अमिरातला पोहचेल.

फ्लाईटमध्ये मिळाला खास अनुभव

मारिना हीने सांगितले की या विमानात चार फ्लाईट अटेंडेंट हजर होते. मात्र, अन्य कोणताही प्रवासी नव्हता. त्यामुळे क्रु मेंबर वेगवेगळ्या आसनांवर बसून आराम करत होते आणि जेवण करत होते. मारिना हीने लिहीलंय पायलट स्वत: त्यांच्याशी बोलायला आले आणि त्यांनी विमानाला उशीर होत असल्याबद्दल माफीही मागितली.

येथे पाहा व्हिडीओ –

मारिना यांनी म्हटलंय की फ्लाईट थोडी लेट होती. परंतू प्रवास एकदम आरामदायक झाला. त्यांना क्रुने खूप खायला देखील दिले. मारिना एकदम सुखरुपपणे दुबईत उतरल्या.आता त्या नव्या नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्याची तयारी करत आहेत.

इराणवर अमेरिका-इस्राईल यांनी २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला आहे. त्यामुळे आखाती देशातील अनेक विमानतळ इराणच्या ड्रोन हल्ल्याने बंद आहेत. तेथे अडकलेले प्रवासी मिळेल त्या विमानाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow Us
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव