AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: कोणत्या शहराला देशाचे गोल्ड कॅपिटल म्हणतात ? नाव ऐकून धक्का बसेल

GK, Trending GK Quiz:जर तुम्हाला विचारले की भारताची गोल्ड कॅपिटल कोणत्या शहराला म्हणतात ? तर तुम्ही विचारात पडाल. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु सारख्या शहराची नावे तुमच्या समोर येतील. गोल्ड कॅपिटल ऑफ इंडियाचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्यचकीत व्हायला होईल.

GK: कोणत्या शहराला देशाचे  गोल्ड कॅपिटल म्हणतात ? नाव ऐकून धक्का बसेल
Gold Capital of India
| Updated on: Jan 23, 2026 | 9:11 PM
Share

GK, Trending GK Quiz: सोने आणि चांदीचे दर सध्या प्रचंड वाढले आहेत. सोने आणि चांदीच्या व्यापारात जसे महाराष्ट्रात जळगावचे नाव आहे तसे देशातील एक शहर गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. येथे सोन्याचे दागिने घडवणारे कारागिर आणि ज्वेलरी शोरुम, सोन्याचा व्यापार होत असतो की हे नाव या शहरास सार्थ ठरते. केरळातील त्रिशूर (Thrissur) या शहरास भारताची सोन्याची राजधानी म्हटले जाते.

Gold Capital of India: त्रिशूरला गोल्ड कॅपिटल का म्हटले जाते?

त्रिशूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडियासाठी म्हटले जाते की येथे देशातील सर्वात मोठा सोन्याचे दागिने तयार करणारे होलसेल आणि रिटेल केंद्र आहे. येथे हजारो ज्वेलरी युनिट्स, वर्कशॉप्स आणि शोरुम असून ते भारतातील मोठ्या भागाला ज्वेलरी पुरवठा करतात. शहरात जुने जाणते करागिर, लाखो मजूरांची टीम आणि केरळाच्या सोने बाजारातील त्यांच्या ताकदीमुळे या शहरास ही पदवी मिळाली आहे. त्रिशूरमध्ये सोन्याचा व्यापार केरळ राज्यात आणि दक्षिण भारतात पसरला आहे.

Gold City Of India: ज्वेलरी बनाने और थोक व्यापार का हब

त्रिशूर मुख्य रूपाने सोन्याचे दागिने तयार करणे आणि होलसेल व्यापाराचे केंद्र आहे.येथे पारंपारिक आणि मॉडर्न दोन्ही प्रकारची ज्वेलरी तयार केली जाते. खास करुन लग्नसमारंभ, सणासुदीसाठी आणि मंदिरांसाठी दागिने तयार केले जातात. येथे हजारो कारागिर, डिझायनर, ट्रेडर आणि सपोर्ट वर्कर्सना रोजगार मिळतो. त्रिशूरमधून दक्षिण भारतात खूप सारे ज्वेलरी बिझनस डिझाईन आणि पुरवठा होतो. भारतात जगात सर्वात जास्त सोन्याचा खप होतो. त्रिशूर सारख्या शहराचे यात जास्त योगदान आहे.

शतकाहून अधिक वर्षे जुना संबंध

त्रिशूरचा सोन्याशी संबंध शतकाहून अधिक वर्षे जुना आहे. येथे पारंपारिक सोनारांनी संघटीत होत ज्वेलरी बनवण्याची कला सुरु केली होती. २० व्या शतकात को-ऑपरेटिव्ह बँक, फायनान्शियल इंस्टीट्युशन आणि ट्रेड नेटवर्क वाढल्याने शहरातील सोन्याचा व्यापार आणखीन मजबूत झाला. आज देशात सर्वात मोठा सोन्याचा ज्वेलरी हब म्हणून त्रिशूर आहे.

माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....