AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 11 January 2025 : महागाईच्या आगीत सोने-चांदीने ओतले तेल, आठवड्याच्या अखेरीस इतके भाव चढले

Gold Silver Rate Today 11 January 2025 : नवीन वर्षात सोन्याने 2 हजारांची सलामी दिली. तर चांदी पण या दहा दिवसात 2 हजारांनी वधारली आहे. चांदीने मध्यंतरी ब्रेक घेतल्यानंतर या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा झेप घेतली. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 11 January 2025 : महागाईच्या आगीत सोने-चांदीने ओतले तेल, आठवड्याच्या अखेरीस इतके भाव चढले
सोने आणि चांदीचा भाव काय
| Updated on: Jan 11, 2025 | 8:22 AM
Share

नवीन वर्षात सोन्याने 2 हजारांची सलामी दिली. तर चांदी पण या दहा दिवसात 2 हजारांनी वधारली आहे. चांदीने मध्यंतरी ब्रेक घेतल्यानंतर या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा झेप घेतली. गेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारने मौल्यवान धातुवरील आयात शुल्कात मोठी कपात केली होती. आयात शुल्क 15 टक्क्यांहून 6 टक्क्यांवर आणले होते. तर यावेळी जीएसटीत कपातीची मागणी होत आहे. जीएसटी 3 टक्क्यांहून 1 टक्के करण्याची मागणी होत आहे. सरकारने मनावर घेतले तर मग यंदा सुद्धा दोन्ही धातुत मोठी घसरण होईल. अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 11 January 2025 )

सोन्यात आले तुफान

सोन्याने दहा दिवसांत 2 हजारांची झेप घेतली. या सोमवार, मंगळवारी भाव स्थिर होता. बुधवारी सोने 100 रुपयांनी तर गुरुवारी 380 रुपयांनी, 10 जानेवारी रोजी 270 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी दोन हजारांनी महाग

गेल्या आठवड्यात चांदी 2 हजारांनी वधारली तर 1 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी वधारली. तीन दिवसात कोणताही बदल झाला नाही. तर 10 जानेवारी रोजी हजारांनी भाव वाढला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,018, 23 कॅरेट 77,706, 22 कॅरेट सोने 71,465 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,514 रुपये, 14 कॅरेट सोने 45,641 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,268 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा