AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 January 2025 : आठवड्याच्या अखेरीस महागले सोने-चांदी; 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या, लगेच चेक करा

Gold Silver Rate Today 12 January 2025 : नवीन वर्षात सोने आणि चांदी तेजीच्या लाटेवर स्वार झाले आहेत. आठवड्यास दोन्ही मौल्यवान धातु महागले. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या, लगेच चेक करा. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 12 January 2025 : आठवड्याच्या अखेरीस महागले सोने-चांदी; 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या, लगेच चेक करा
सोने-चांदीचा भाव काय?
| Updated on: Jan 12, 2025 | 8:37 AM
Share

नवीन वर्षात सोने आणि चांदीने जबरदस्त फटकेबाजी केली. या 10 दिवसांचा विचार केला तर सोने आणि चांदीत प्रत्येकी 2 हजारांची जबरदस्त वाढ दिसली. मध्यंतरी ढेपाळल्यानंतर चांदीने पुन्हा भरारी घेतली. या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मोठी झेप घेतली. तर चांदीने पण सिक्सर लगावला. दरम्यान गेल्यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांहून 6 टक्के करण्याचा निर्णय झाला. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला. आता जीएसटी 3 टक्क्यांहून 1 करण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास दोन्ही धातु खरेदीसाठीचा अतिरिक्त खर्च कमी होईल. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 12 January 2025 )

सोने दुडूदुडू धावले

सोने या दहा दिवसांत 2 हजारांनी महागले. आठवड्याच्या सुरुवातीला भाव स्थिर होता. बुधवारी त्यात 100 रुपयांची तर गुरुवारी 380 रुपये, 10 जानेवारीला 270 रुपयांची भर पडली. या तीन दिवसांत सोने 650 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने मरगळ झटकली

गेल्या आठवड्यात चांदी दोन हजारांनी महागली तर एक हजारांनी स्वस्त झाली. या सोमवारी चांदीने एक हजारांची भरारी घेतली. मध्यंतरी ब्रेक घेतल्यानंतर 10 जानेवारी रोजी चांदी 1 हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,018, 23 कॅरेट 77,706, 22 कॅरेट सोने 71,465 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,514 रुपये, 14 कॅरेट सोने 45,641 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,268 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार