AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 13 August 2024 : चांदी झाली स्वस्त, पण सोन्याने केला उलटफेर, आता 10 ग्रॅमसाठी मोजा इतके पैसे

Gold Silver Rate Today 13 August 2024 : तर गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने मुसंडी मारली होती. या सोमवारी सोन्याने महागाईचा तोरा मिरवला तर चांदीची चमक फिक्की पडली. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना आता इतके पैसे मोजावे लागतील. सराफा बाजारात आता अशा आहेत किंमती..

Gold Silver Rate Today 13 August 2024 : चांदी झाली स्वस्त, पण सोन्याने केला उलटफेर, आता 10 ग्रॅमसाठी मोजा इतके पैसे
सोने आणि चांदीचा दर
| Updated on: Aug 13, 2024 | 8:34 AM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या अखेरीस मोठा धक्का दिला होता. दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतली होती. सोने एक हजार रुपयांनी महागले होते. तर चांदीने 1600 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यातील महागाईचे सत्र कायम आहे. तर चांदीत घसरण झाली आहे. काय आहेत आता या बेशकिंमती धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 13 August 2024 )

महागाईचे सत्र सुरूच

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात घसरण झाली आणि अखेरच्या दोन दिवसांत त्यात वाढ झाली. 1040 रुपयांनी किंमती वाढल्या होत्या. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने 270 रुपयांनी वधारले. तर आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी घसरली

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 4200 रुपयांनी उतरली होती. त्यानंतर 1600 रुपयांनी किंमती वधारल्या. या आठवड्याच्या सुरुवातीला 12 ऑगस्ट रोजी चांदी किलोमागे 600 रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रात त्यात पुन्हा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69890, 23 कॅरेट 69,610, 22 कॅरेट सोने 64,019 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,418 रुपये, 14 कॅरेट सोने 40,886 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 81,124 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा