Gold Silver Rate Today 14 May 2024 : ग्राहकांना मोठा दिलासा; मोठ्या उसळीनंतर सोने-चांदीत इतकी स्वस्ताई; अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 14 May 2024 : गेल्या आठवड्यात सोन्याने 2 हजारांची भरारी घेतली होती. त्यात 550 रुपयांची घसरण झाली होती. चांदीनेही जोरदार मुसंडी मारली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी जमिनीवर आले आहेत. काय आहेत आता मौल्यवान धातूचा भाव

Gold Silver Rate Today 14 May 2024 : ग्राहकांना मोठा दिलासा; मोठ्या उसळीनंतर सोने-चांदीत इतकी स्वस्ताई; अशा आहेत किंमती
सोने आणि चांदी झाले स्वस्त
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 8:28 AM

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूने दिलासा दिला होता. पण अक्षय तृतीयाला बेशकिंमती धातूंनी महागाईचा मुहूर्त गाठला. सोने-चांदी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना प्रति ग्रॅम आणि प्रति किलो जादा रक्कम मोजावी लागली. ग्राहकांचा हिरमोड झाला. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण दिसली. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली. दोन्ही धातूत घसरण दिसली. आता सोने आणि चांदीची काय आहे किंमत (Gold Silver Price Today 14 May 2024 )

सोन्यात स्वस्ताई

गेल्या आठवड्यात सोने 2050 रुपयांनी वधारले. 10 मे रोजी सोन्याने 1530 रुपयांची उंच भरारी घेतली. अखेरच्या सत्रात सोने 330 रुपयांनी घसरले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने आनंदवार्ता दिली. 13 मे रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत झाली घसरण

गेल्या आठवड्यात चांदी 4700 रुपयांनी महागली. 10 मे रोजी चांदीने 2500 रुपयांचा पल्ला गाठला. 11 मे रोजी 700 रुपयांनी चांदी नरमली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 13 मे रोजी चांदीत 500 रुपयांची स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीत स्वस्ताई आली. 24 कॅरेट सोने 72,164 रुपये, 23 कॅरेट 71,875 रुपये, 22 कॅरेट सोने 66,102 रुपये झाले. 18 कॅरेट 54,123 रुपये, 14 कॅरेट सोने 42,216 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,494 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...