AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 16 March 2025 : सोने ओलांडणार लाखाचा टप्पा? का वाढली चमक, का झाले महाग? चांदीचा भाव जाणून घ्या

Gold Silver Rate Today 16 March 2025 : सोन्यासह चांदीने महागाईची धुळवड उडवल्याने हा रंग आता काही निघणार नाही, असा दावा सराफा बाजारात करण्यात येत आहे. सोने खरंच लाखांचा टप्पा ओलांडणार आहे का? 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 16 March 2025 : सोने ओलांडणार लाखाचा टप्पा? का वाढली चमक, का झाले महाग? चांदीचा भाव जाणून घ्या
सोने आणि चांदीचा भाव काय?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 16, 2025 | 8:42 AM
Share

सोने आणि चांदीने अशी काही धुळवड खेळली की ग्राहकांचे रंगलेले चेहरे सुद्धा उतरले आहेत. त्यांचा रंगच उडाला आहे. त्यांचा रंग फिक्का झाला आहे. येत्या काही दिवसात सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या वर्षी जानेवारी ते मार्चमधील सोने आणि चांदीचा भाव अनेकांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. सोन्याने जवळपास 16 हजारांची झेप घेतली आहे. तर चांदीने पण किलोमागे मोठी झेप घेतली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...(Gold Silver Price Today 16 March 2025 )

सोन्यात तुफान वाढ

या आठवड्यात सोन्याने ग्राहकांचे डोळे पांढरे केले. एक दिवस वगळता इतर दिवशी दरवाढीचे सत्र दिसून आले. पहिल्या दिवशी सोने 110 रुपयांनी वधारले. मंगळवारी 330 रुपयांनी भाव कमी झाले. बुधवारी 490 रुपये, गुरूवारी 600 आणि 120 रुपयांनी सोने महागले. तीन दिवसात सोन्याने 1200 रुपयांचा टप्पा गाठला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने ओलांडला लाखांचा टप्पा

या दोन आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. पहिल्या दोन दिवसात चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली. बुधवारी 2 हजार, गुरूवारी 1 हजार तर शुक्रवारी 2 हजारांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,843, 23 कॅरेट 86,495 22 कॅरेट सोने 79,548 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,132 रुपये, 14 कॅरेट सोने 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,322 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोने का झाले महाग?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणामुळे ट्रेड वॉर भडकले

देशात विवाह सोहळे सुरू आहेत. सोन्याची मागणी वाढली आहे

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने घसरत आहे

जागतिक बाजाराला महागाईचे चटके बसत आहे. सोन्यात गुंतवणूक वाढली आहे

शेअर बाजाराने धोका दिल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले आहेत.

परिस्थिती अशीच राहिल्यास सोने लाखाचा टप्पा पार करणार

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...