AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोन्याने घेतली उसळी; चांदी 2500 रुपयांनी महागली, आता असा आहे भाव

Gold Silver Rate Today 18 February 2024 | आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदी पुन्हा महागले. गेल्या दोन महिन्यांपासून हा ट्रेंड सुरु आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आठवड्याच्या शेवटी आणि सुरुवातीला दरवाढ होत होती. अनेक आठवड्यात हाच पॅटर्न दिसून आला. आता काय आहेत सोने-चांदीच्या किंमती, जाणून घ्या..

Gold Silver Rate Today | सोन्याने घेतली उसळी; चांदी 2500 रुपयांनी महागली, आता असा आहे भाव
| Updated on: Feb 18, 2024 | 8:33 AM
Share

नवी दिल्ली | 18 February 2024 : ग्राहकांना सोने आणि चांदीने जानेवारी महिन्यापासून दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्यात सोने-चांदीने उच्चांकी कामगिरी बजावली होती. तेव्हापासून सोने-चांदीत चढउतार असला तरी किंमतींनी उच्चांकी झेप घेतली नाही. फेब्रुवारी महिन्यात पण मौल्यवान धातूत पडझडीचे सत्र सुरु होते. या आठवड्यात बुधवारी सोन्याच्या किंमती 800 रुपयांनी घसरल्या. तर चांदी 14 फेब्रुवारीला 1500 रुपयांनी घसरली होती. त्यानंतर शुक्रवार, शनिवारी किंमतीत वाढ झाली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 18 February 2024)

दोन दिवसांत सोने महागले

या आठवड्यात सोन्यात 900 रुपयांची स्वस्ताई आली. बुधवारी 680 रुपयांची घसरण दिसली. 13 फेब्रुवारी रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या.14 फेब्रुवारी रोजी दरात 680 रुपयांची कपात झाली. 15 फेब्रुवारी रोजी किंमतीत 100 रुपयांची कपात झाली. 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 5,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2500 रुपयांनी महागली

या आठवड्यात 12 फेब्रुवारी रोजी चांदीत 500 रुपयांनी दरवाढ झाली. तर 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. तर 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या. शनिवारी, 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. बुधवारी 24 कॅरेट सोने 61,743 रुपये, 23 कॅरेट 61,496 रुपये, 22 कॅरेट सोने 56,557 रुपये झाले. 18 कॅरेट 46,307 रुपये, 14 कॅरेट सोने 36,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,922 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...