AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सराफा बाजारात आनंद लहरी! सोने घसरणीवर तर चांदीचा भाववाढीचा धक्का

Gold Silver Rate Today : ऑगस्ट महिन्यात सोन्याला बळ न मिळाल्याने ग्राहकांना मोठा फायदा झाला. चांदीतही घसरण झाली होती. पण चांदीने पुन्हा कमबॅक करत सर्वांनाच धक्का दिला. गुडरिटर्न्सनुसार, चांदीत जवळपास एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today : सराफा बाजारात आनंद लहरी! सोने घसरणीवर तर चांदीचा भाववाढीचा धक्का
| Updated on: Aug 19, 2023 | 9:29 AM
Share

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : अमेरिकन डॉलरच्या (Dollar) ताबडतोब चढाईने सोने-चांदीला (Gold-Silver Price Today) या महिन्यात अजूनपर्यंत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. घसरणीच्या सत्रात सोन्याचा जवळपास बाजार उठला आहे. पण चांदीची दरवाढीसाठी चढाई सुरुच आहे. चांदी मध्यंतरी नरमली होती. गुडरिटर्न्सनुसार, चांदीने पुन्हा कमबॅक केले आहे. चांदीने एक हजार रुपयांची चढाई केली. शुक्रवारी अमेरिकन बाजारात सोन्यात किंचीत वाढ झाली. तर चांदीने पुन्हा दरवाढीचा सूर कायम ठेवला. तिथे सोन्याचे भाव गेल्या पाच महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले आहे. तर डॉलर गेल्या दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. त्याचे परिणाम जगभर दिसत आहे. सोने 60,000 रुपयांच्या पण खाली आले आहे. डॉलरचा रुबाब कायम राहिला आणि गंगाजळीत अजून वाढ झाली तर सोन्याला मोठी उसळी मारता तर येणारच नाही. पण सध्याच्या भाव टिकवणे पण अवघड होईल. सोन्यात मोठी घसरण येऊ शकते.

IBJAकडून भाव जाहीर नाही

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

आठवड्यात झाली इतकी घसरण

या आठवड्यात सुट्यांमुळे एक दिवस भाव जाहीर झाला नाही. तर सोन्याला या आठवड्यात खासा कामगिरी करता आली नाही. सोन्यात पुन्हा पडझड झाली. 550 रुपयांची घसरण झाली. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.17 ऑगस्ट रोजी किंमती 350 रुपयांनी घसरल्या. या महिन्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली होती. 22 कॅरेट सोने 54,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,170 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीने केली चढाई

ऑगस्ट महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला होता. भाव 200 रुपयांनी वाढले होते. तर 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,471 रुपये, 23 कॅरेट 58,237 रुपये, 22 कॅरेट सोने 53,559 रुपये, 18 कॅरेट 43,853 रुपये, 14 कॅरेट सोने 34,206 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,447रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?