AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 19 September 2024 : पितृपक्षात दर आला खाली, सोने आणि चांदीत इतकी स्वस्ताई, मौल्यवान धातूच्या खरेदीचा योग्य मुहूर्त कोणचा?

Gold Silver Rate Today 19 September 2024 : पितृपक्षात आजही अनेक कामं वर्ज्य मानण्यात येतात. या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात येते. काही जण या काळात मोठ्या उलाढाली टाळतात. पण पितृपक्षातील या तिथीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते, तुम्हाला माहिती आहे का?

Gold Silver Rate Today 19 September 2024 : पितृपक्षात दर आला खाली, सोने आणि चांदीत इतकी स्वस्ताई, मौल्यवान धातूच्या खरेदीचा योग्य मुहूर्त कोणचा?
पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदीचा योग्य मुहूर्त कोणचा?
| Updated on: Sep 19, 2024 | 8:27 AM
Share

पितृपक्ष लागताच सोने आणि चांदीचा भाव धपकन आदळला. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंनी मोठी मुसंडी मारली होती. सोने 900 रुपयांनी तर चांदी 8,600 रुपयांनी महागले होते. पण या आठवड्यात सोमवार वगळता इतर दोन दिवस मौल्यवान धातूत घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा घसरणीचे संकेत मिळत आहेत. पितृपक्षात आजही अनेक कामं वर्ज्य मानण्यात येतात. या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात येते. काही जण या काळात मोठ्या उलाढाली टाळतात. पण पितृपक्षातील या तिथीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. आता काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 19 September 2024 )

सोने 270 रुपयांनी स्वस्त

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 900 रुपयांनी वधारली. 17 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी उतरले. तर 18 सप्टेंबर 160 रुपयांनी घसरण झाली. सोने एकूण 270 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सुध्दा भावात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी दोन हजार रुपयांनी झाली स्वस्त

गेल्या आठवड्यात चांदी 7 हजार रुपयांनी महागली होती. चांदी अजून उसळी घेण्याची शक्यता होती. पण पितृपक्ष आल्याने चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदीत हजार रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी प्रत्येकी एक हजारांनी चांदी उतरली. आज सकाळच्या सत्रात पण चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,257, 23 कॅरेट 72,964, 22 कॅरेट सोने 67,103 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,943 रुपये, 14 कॅरेट सोने 42,855 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,406 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी