AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 2 February 2025 : Budget नंतर सोने-चांदीची काय अपडेट? किंमती वधारल्या की मिळाला दिलासा

Gold Silver Rate Today 2 February 2025 : Budget 2025 ने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला. शेअर बाजाराने लागलीच नाराजी व्यक्त केली. तर आता सोने आणि चांदीच्या काय आहेत किंमती? तीन दिवसांच्या तुफान बॅटिंगनंतर आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 2 February 2025 : Budget नंतर सोने-चांदीची काय अपडेट? किंमती वधारल्या की मिळाला दिलासा
सोने-चांदीची किंमत काय
| Updated on: Feb 02, 2025 | 8:29 AM
Share

Budget 2025 मध्ये करदात्यांना मोदी सरकारने एकदाचे भरभरून दिले. तर दुसरीकडे अप्रत्यक्ष करात वाढीची भीती पण आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराने नाराजी जाहीर केली. आता सोने आणि चांदीच्या बाजारात या बजेटचा काय परिणाम झाला हे सोमवारी प्रकर्षाने दिसून येईल. शनिवार आणि रविवार आल्याने या क्षेत्रातील प्रमुख संस्थांनी किंमती जाहीर केल्या नाहीत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 2 February 2025 )

सोन्याची रॉकेट भरारी

गेल्या महिन्यात सोन्याने जवळपास 6 हजारांची भरारी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे 170 आणि 320 अशी 490 रुपयांची स्वस्ताई आली. तर 29 जानेवारीला सोने 920, 30 जानेवारीला 170 तर 31 जानेवारी रोजी 131 रुपयांनी महागले. काल भावाची अपडेट मिळाली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 77,460 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अखेरच्या सत्रात चांदी चमकली

जानेवारी महिन्यात चांदी अनेकवेळा दरवाढीच्या ट्रॅकवरून घसरली. तर महिना अखेरीस 24 जानेवारीला 1 हजारांची दरवाढ तर 27 जानेवारीला 1 हजारांची घसरण झाली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. 31 जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. 1 फेब्रुवारी रोजी किंमतीत अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,600 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 82,086, 23 कॅरेट 81,757, 22 कॅरेट सोने 75,191 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 61,565 रुपये, 14 कॅरेट सोने 48,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,533 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?