AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोन्याची मुसंडी; चांदीने घेतली माघार, सराफा बाजारात खिसा किती खाली होणार?

Gold Silver Rate Today 20 February 2024 | गेल्या आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदीने उसळी घेतली होती. गेल्या आठवड्यात सोन्यात 900 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 1500 रुपयांनी वधारली होती. आठवड्याच्या शेवटी दोन्ही सोने 300 रुपयांनी तर चांदी 2,000 रुपयांनी वधारली होती. आता अशा आहेत किंमती..

Gold Silver Rate Today | सोन्याची मुसंडी; चांदीने घेतली माघार, सराफा बाजारात खिसा किती खाली होणार?
सोने वधारले, चांदी जैसे थे
| Updated on: Feb 20, 2024 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 20 February 2024 : ग्राहकांना जानेवारीपासून सोने आणि चांदीने दिलासा दिला आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. पण डिसेंबर 2023 सारखी उच्चांकी कामगिरी दोन्ही धातूंनी बजावली नाही. डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूंनी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. फेब्रुवारीतही पडझडीचे सत्र सुरु होते. गेल्या आठवड्यात सोन्यात 900 रुपयांची घसरण दिसून आली तरतर चांदी 1500 रुपयांनी महागली होती. आठवड्याच्या शेवटी दोन्ही सोने 300 रुपयांनी तर चांदी 2,000 रुपयांनी वधारली होती. सोमवारी सोने वधारले तर चांदीत घसरण दिसून आली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 19 February 2024)

सोने महागले

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात घसरण दिसून आली. तर त्यानंतर किंमती वधारल्या. आठवड्याच्या शेवटी 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 500 रुपयांनी स्वस्त

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. तर 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या. 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर सोमवारी, 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,017 रुपये, 23 कॅरेट 61,769 रुपये, 22 कॅरेट सोने 56,808 रुपये झाले. 18 कॅरेट 46,513 रुपये, 14 कॅरेट सोने 36,280 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,210 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...