AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 20 October 2024 : सोन्याची तीनच दिवसात तुफान बॅटिंग, चांदीने केला विक्रम, दिवाळीत किंमतीत होणार का घसरण?

Gold Silver Rate Today 20 October 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने दमदार कामगिरी केली. सोन्याने तीनच दिवसात मोठी उसळी घेतली. सोन्याने आठवड्याच्या अखेरच्या सत्रात 800 हून अधिकचा टप्पा गाठला. तर चांदीने कमाल दाखवली. दिवाळीपर्यंत दोन्ही मौल्यवान धातु मोठी मजल मारतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मग किंमती कधी होणार कमी?

Gold Silver Rate Today 20 October 2024 : सोन्याची तीनच दिवसात तुफान बॅटिंग, चांदीने केला विक्रम, दिवाळीत किंमतीत होणार का घसरण?
सोने आणि चांदीची घौडदौड
| Updated on: Oct 20, 2024 | 8:37 AM
Share

दिवाळीसाठी बाजारपेठ सजली आहे. सणांचा राजा दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजत आहेत. अशा धामधुमीत सोने आणि चांदीने जबरदस्त धावा चोपल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांत सोने हजारांनी वाढले. तर चांदीने दोन हजारांची मुसंडी मारली आहे. सोने तर एकाच दिवसात 800 हून अधिक रुपयांनी वधारले आहे. सोने या सणासुदीत 80 हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवाढ होत असताना ग्राहकांना मौल्यवान धातु कधी स्वस्त होईल असा प्रश्न पडला आहे. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 20 October 2024 )

सोन्याचा नवीन रेकॉर्ड

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 15 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांची स्वस्ताई आली. त्यानंतर मग सोन्याने दरवाढीचा गिअर टाकला. 16 ऑक्टोबरला 490, 17 सप्टेंबर रोजी 220 रुपयांनी तर 18 ऑक्टोबरला 870 रुपयांची मुसंडी सोन्याने मारली.  दिवाळीनंतर ही काही दिवस सोने वधारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण जगातील दोन युद्धांना विराम लागल्यास भाव कमी होऊ शकतो.  गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने मारली मोठी मजल

चांदीला गेल्या महिन्याच्या अखेरपासून ते या महिन्याच्या मध्यापर्यंत सूर गवसला नव्हता. 5 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. 11 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी महागली होती. आता 18 ऑक्टोबर रोजी चांदीने 2 हजारांची मजल मारली. या दरवाढीमुळे गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,283 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र