AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | चांदी घसरली, सोन्याचा तोरा कायम, भाव घ्या जाणून

Gold Silver Rate Today 21 January 2024 | या महिन्यात सोने-चांदीत पडझडीचे सत्र आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात घसरणीला ब्रेक लागतो. गेल्या तीन आठवड्यात अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसून येते. सोन्याने महागाईची तर चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली.

Gold Silver Rate Today | चांदी घसरली, सोन्याचा तोरा कायम, भाव घ्या जाणून
| Updated on: Jan 21, 2024 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली | 21 January 2024 : सोने-चांदीत यावर्षाच्या पहिल्याच महिन्यात पडझड झाली. 15 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली. अधूनमधून सोने-चांदीने चमकदार कामगिरी दाखवली. आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या दिवशी सोन्यात उसळी आल्याचे दिसून येते. शुक्रवारी आणि शनिवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. तर चांदीने शुक्रवारी उसळी घेतली तर शनिवारी भावात घसरण झाली. दोन दिवसांत सोने जवळपास 450 रुपयांनी वधारले. तर चांदीत 200 रुपयांची घसरण दिसली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 21 January 2024)

सोने चमकले

सोन्यात या 15 दिवसांत 2150 रुपयांची घसरण झाली. 16 जानेवारीला 100 रुपयांनी, 17 जानेवारी रोजी 350 रुपयांनी आणि 18 जानेवारीला 300 रुपयांनी सोने स्वस्त झाले. शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी सोन्याच्या किंमत 330 रुपयांनी वधारली. 20 जानेवारी रोजी त्यात 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत घसरण

या महिन्यात चांदीने पण मोठा दिलासा दिला. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदीत 1400 रुपयांची वाढ झाली. त्यापूर्वी चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 16 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी, 17 जानेवारीला 600 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी भावात 400 रुपयांची घसरण झाली. 19 जानेवारीला चांदी 200 रुपयांनी वधारली. तर त्यात शनिवारी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,390 रुपये, 23 कॅरेट 62,140 रुपये, 22 कॅरेट सोने 57,149 रुपये झाले. 18 कॅरेट 46,793 रुपये, 14 कॅरेट सोने 36,498 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,228 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?