AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीची दरवाढीची सलामी! असा वधारला भाव

Gold Silver Rate Today 20 January 2024 | सोने-चांदीने आठवड्याच्या शेवटी उसळी घेतली. गेल्या आठवड्यात आणि त्यापूर्वीच्या आठवड्यात पण हाच पॅटर्न होता. तिसऱ्यांदा हा पॅटर्न रिपीट झाला. आठवडाभर घसरण आणि नंतर शेवटच्या सत्रात घसरण अशी किंमतीची खेळी सुरु आहे. जवळपास 15 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली आहे.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीची दरवाढीची सलामी! असा वधारला भाव
| Updated on: Jan 20, 2024 | 8:46 AM
Share

नवी दिल्ली | 20 January 2024 : सोने-चांदी जवळपास 15 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली आहे. तर उर्वरीत दिवसात या मौल्यवान धातूत वाढ झाली आहे. किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना या वर्षाच्या सुरुवातीलाच दिलासा मिळाला. पण गेल्या तीन आठवड्यात अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसून येते. शुक्रवार, शनिवारी किंमतीत वाढ होते. त्यामुळे या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. या जवळपास 20 दिवसांत, 15 दिवस भावात घसरण दिसून आली.तर उर्वरीत भाव वधारले. आता अशी आहे सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 20 January 2024)

सोन्याची किंमत वधारली

या वर्षात 3 ते 11 जानेवारी दरम्यान सोन्याचा भाव घसरला. 12 ते 15 जानेवारी दरम्यान भाव 550 रुपयांनी वाढले. 16 जानेवारीला 100 रुपयांनी, 17 जानेवारी रोजी 350 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दरवाढ

या वर्षात चांदीत मोठी घसरण झाली. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदीत 1400 रुपयांची वाढ झाली. त्यापूर्वी चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 16 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी, 17 जानेवारीला 600 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी भावात 400 रुपयांची घसरण झाली. 19 जानेवारी रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,390 रुपये, 23 कॅरेट 62,140 रुपये, 22 कॅरेट सोने 57,149 रुपये झाले. 18 कॅरेट 46,793 रुपये, 14 कॅरेट सोने 36,498 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,228 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...