Gold Silver Rate Today | ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीत मोठी घसरण

Gold Silver Rate Today 19 January 2024 : सोने-चांदीच्या किंमतीत 'कोसळ'धार सुरु आहे. भावात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण झाली. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोने-चांदी या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात उतरणीवर आहे. या जवळपास 20 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली.

Gold Silver Rate Today | ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीत मोठी घसरण
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 8:39 AM

नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : नवीन वर्षाचा पहिलाच महिना, जानेवारी ग्राहकांच्या पथ्यावर पडला. सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांची पावले आपोआप सराफा बाजाराकडे वळली. डिसेंबर महिन्यात दरवाढीचा नवीन उच्चांक गाठल्यानंतर या नवीन वर्षांत किंमतीत सातत्याने घसरण सुरु आहे. या जवळपास 20 दिवसांत, 15 दिवस भावात घसरण दिसून आली. गेल्या शनिवार ते सोमवार या दरम्यान भावात वाढ झाली. पण मंगळवारपासून मौल्यवान धातू घसरणीवर आहेत. या तीन दिवसांत सोने 750 रुपयांनी तर चांदी 1300 रुपयांनी उतरली. तर जवळपास 20 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली. अशी आहे सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 19 January 2024)

  1. सोन्यात आपटी बार – नवीन वर्षात 3 ते 11 जानेवारी दरम्यान सोन्याचा भाव उतरला. 12 ते 15 जानेवारी दरम्यान भाव 550 रुपयांनी वधारले. त्यानंतर आता 16 जानेवारीला 100 रुपयांनी, 17 जानेवारी रोजी 350 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीची चमक फिक्की – नवीन वर्षात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदी 1400 रुपयांनी महागली होती. तर त्यापूर्वी चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 16 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी, 17 जानेवारीला 600 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी भावात 400 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 61,970 रुपये, 23 कॅरेट 61,722 रुपये, 22 कॅरेट सोने 56,765 रुपये झाले. 18 कॅरेट 46,478 रुपये, 14 कॅरेट सोने 36,253 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,898 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.