AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्याचा तोरा उतरला, चांदीतही नरमाई, आता खरेदीची करा की घाई

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारात सोने-चांदी दबावाखाली आहे. अमेरिकेच्या वायदे बाजारात सोने 14.30 अंकांनी घसरले तर चांदीत 0.78 अंकांनी घसरली. सोने 1955.80 वरुन थेट 1929.40 पर्यंत घसरले. भारतीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातूत असा बदल झाला.

Gold Silver Rate Today : सोन्याचा तोरा उतरला, चांदीतही नरमाई, आता खरेदीची करा की घाई
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Jun 21, 2023 | 9:15 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीवर (Gold Silver Rate Today) जागतिक बाजारात दबाव आहे. अमेरिकन वायदे बाजारात सोने 14.30 अंकांनी घसरले तर चांदीत 0.78 अंकांनी घसरली. सोने 1955.80 वरुन थेट 1929.40 पर्यंत घसरले. भारतीय सराफा बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार आहे. मंगळवारी सोने प्रति 10 ग्रॅम 59,345 रुपये होते. गेल्या आठवड्यात 16 जून रोजी हा भाव 59582 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीने मात्र दबाव झुगारला आहे. चांदीत 16 जून रोजी प्रति किलो 1358 रुपयांनी भाव वधारले होते. मे महिन्यापासून सोने-चांदीचा दर घसरला आहे. दोन्ही धातूला नवीन कोणताही विक्रम करता आलेला नाही.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी 24 कॅरेट सोने 59345 रुपये, 23 कॅरेट 59107 रुपये, 22 कॅरेट सोने 54360 रुपये, 18 कॅरेट 44509 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34717 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

दोन दिवसांत अशी झाली घसरण गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्यात आज 20 जून रोजी 200 रुपयांची घसरण झाली. या किंमती 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या. तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60,150 रुपये झाल्या. काल हा भाव अनुक्रमे 55,350 रुपये आणि 60,210 रुपये होता. आज सकाळच्या सत्रातील किंमती जाहीर झाल्या नाहीत.

मे-जूनमध्ये घसरण सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.

मिस्ड कॉलवर जाणून घ्या भाव 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार