AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्याने आणली आनंदवार्ता, चांदीचा पण दिलासा

Gold Silver Rate Today : दिवाळीपासून सोने-चांदीचा सूर बदलला. धनत्रयोदशी, पाडव्यानंतर गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी जोरदार मुसंडी मारली. गेल्या आठवड्यात चार दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी नरमाईचे सूर आळवले. काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्याने आणली आनंदवार्ता, चांदीचा पण दिलासा
| Updated on: Nov 21, 2023 | 8:39 AM
Share

नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण होती. दिवाळीत धनत्रयोदशी आणि पाडव्याला सोने-चांदीने उसळी घेतली. शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा खिसा कापल्या गेला. या दिवशी दरवाढ झाली असली तरी मौल्यवान धातूंची जम के खरेदी झाली. त्यानंतर मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरु होते. गेल्या आठवड्यात सोने-चांदीने कहर केला. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. देशभरातील सराफा बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. चारच दिवसांत सोने-चांदीने (Gold Silver Price Today 21 November 2023) मोठी झेप घेतल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला. या आठवड्याच्या सुरुवात ग्राहकांसाठी आनंदवार्ता घेऊन आली.

ग्राहकांना दिलासा

नोव्हेंबरच्या मध्यावर दिवाळीत दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी घसरण झाली. त्यानंतर मात्र किंमतीत जोरदार वाढ झाली. तीन दिवसांत किंमतीत जवळपास 1200 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत स्वस्ताई

गेल्या आठवड्यात चांदीने दरवाढीत कहर केला. तीनच दिवसांत चांदीने 4100 रुपयांची झेप घेतली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती थेट 1700 रुपयांनी वधारल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 17 नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. 18 नोव्हेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक कायम आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,888 रुपये, 23 कॅरेट 60,644 रुपये, 22 कॅरेट सोने 55,773 रुपये झाले. 18 कॅरेट 45,666 रुपये, 14 कॅरेट सोने 35,620 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,561 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?