AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 23June 2024 : दमदार सुरुवातीनंतर आपटले सोने आणि चांदी; भाव झाले एकदम कमी

Gold Silver Rate Today 23 June 2024 : सोने-चांदीने गेल्या दोन दिवसात तुफान बॅटिंग केली. मौल्यवान धातूचे भाव झरझर वधारले. पण आता अखेरच्या सत्रात बेशकिंमती धातूत मोठी पडझढ झाली आहे.

Gold Silver Rate Today 23June 2024 : दमदार सुरुवातीनंतर आपटले सोने आणि चांदी; भाव झाले एकदम कमी
चांदी वधारली, सोने नरमले
Updated on: Jun 23, 2024 | 8:29 AM
Share

गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीने ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला. या महिन्यात आतापर्यंत सोने-चांदीला कमाल दाखविता आली नाही. पण गेल्या दोन दिवसांत किंमती झरझर वधारल्या होत्या. अखेरच्या सत्रातील या तडाखेबंद खेळीने ग्राहकांच्या खरेदीवर पाणी फेरले गेले. पण त्यानंतर एकाच दिवसात या धातूत पुन्हा मोठी पडझड झाली. किंमती दणकावून आपटल्या. काय आहेत आता भाव ?(Gold Silver Price Today 23 June 2024 )

मुसंडीनंतर दणकावून आपटले सोने

गेल्या दोन दिवसांत सोन्याने जोरदार भरारी घेतली. त्यामुळे या महिन्यात सोने आता दमदार कामगिरी दाखवेल असे वाटत होते. पण एकाच दिवसात त्यात मोठी घसरण आली. 17 जून रोजी सोन्यात 220 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत मोठा बदल झाला नाही. 20 जूनला 220 रुपयांची दरवाढ झाली. 21 जूनला सोन्याने 810 रुपयांची उसळी घेतली. तर 22 जून रोजी किंमती 870 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत आपटी बार

या आठवड्यात अखरेच्या सत्रात चांदीने 3000 रुपयांची मुसंडी मारली. आता चांदीत 2000 रुपयांची घसरण झाली. 18 जूनला 500 रुपयांनी चांदी वधारली. नंतर तितकाच भाव उतरला. 20 आणि 21 जून रोजी चांदी प्रत्येकी 1500 रुपयांनी म्हणजे एकूण 3,000 रुपयांनी महागली. 22 जून रोजी चांदी 2000 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,746 रुपये, 23 कॅरेट 72,455 रुपये, 22 कॅरेट सोने 66,635 रुपये झाले. 18 कॅरेट 54,560 रुपये, 14 कॅरेट सोने 42,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,666 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.