AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने चमकले, चांदीने पण दाखवला रंग! अशा वधारल्या किंमती

Gold Silver Rate Today 25 February 2024 | रविवारी, सोने-चांदीच्या ग्राहकांना सराफा बाजारात जाताना खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीत कमाल वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. या आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसून आले आहे.

Gold Silver Rate Today | सोने चमकले, चांदीने पण दाखवला रंग! अशा वधारल्या किंमती
| Updated on: Feb 25, 2024 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली | 25 February 2024 : आठवड्याच्या अखेरीस खरेदीवर अखेर सोने आणि चांदीने विरजण घातले. ग्राहकांना आज खरेदीसाठी बाहेर जाताना खिसा खाली करावा लागणार आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. सोमवारी भावाने उसळी घेतली तर मंगळवारी किंमती घसरल्या. त्यानंतरच्या दिवसातही किंमतीत चढउतार दिसून आला. तर एका दिवसापूर्वी मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाली होती. चांदीने तर ग्राहकांना मोठा दिलासा दिला होत. आठवड्याच्या शेवटी सोने आणि चांदीच्या अशा आहेत किंमत (Gold Silver Price Today 25 February 2024)

सोने 200 रुपयांनी वधारले

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत बदल होत होता. चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्यात 19 फेब्रुवारीला 270 रुपयांनी किंमती वाढल्या. 20 फेब्रुवारीला 100 रुपयांनी किंमती उतरल्या. 21 फेब्रुवारीला सोने 250 रुपयांनी महागले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. काल भावात अपडेट दिसली नाही. 24 फेब्रुवारी रोजी त्यात 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

स्वस्ताईनंतर चांदीत 400 रुपयांची वाढ

या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी उतरली. आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी 700 आणि 23 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची पडझड झाली. 24 फेब्रुवारीला किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,008 रुपये, 23 कॅरेट 61,760 रुपये, 22 कॅरेट सोने 56,799 रुपये झाले. 18 कॅरेट 46,506 रुपये, 14 कॅरेट सोने 36,275 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,653 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?