AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 25 January 2025 : आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीचा दणका; आता किंमत काय?

Gold Silver Rate Today 25 January 2025 : या आठवड्यात जाता जाता सोने आणि चांदीने ग्राहकांना दणका दिलाच. सोन्याने गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात मोठी झेप घेतली. तर अखरेच्या टप्प्यात किलोमागे चांदी हजार रुपयांनी वधारली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 25 January 2025 : आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदीचा दणका; आता किंमत काय?
सोने-चांदीची मोठी भरारी
| Updated on: Jan 25, 2025 | 8:27 AM
Share

गेल्या दोन आठवड्यात सोन्याने जबरदस्त झेप घेतली आहे. तर चांदीने पण मजल दरमजल करत मोठे अंतर कापले आहे. सोने या काळात 3000 रुपयांनी महागले. तर चांदीने मरगळ झटकत हजारांची दरवाढ नोंदवली. ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीची ही घोडदौड वधू-वर मंडळींचा जीव कासावीस करणारी आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 25 January 2025 )

सोने 1300 रुपयांनी महागले

मागील आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी वधारले. या दोन आठवड्यात सोने 3000 रुपयांनी महागले. या आठवड्यात सोमवारी 120 रुपये तर 22 जानेवारी रोजी 860 रुपयांनी आणि 24 जानेवारीला 330 रुपयांची त्यात भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने मरगळ झटकली

मागील आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली आणि 2 हजारांनी स्वस्त झाली होती. तर 18 जानेवारीपासून ते गुरुवारपर्यत चांदीने मोठी विश्रांती घेतली. तर 24 जानेवारीला 1 हजारांनी किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,348, 23 कॅरेट 80,026, 22 कॅरेट सोने 73,599 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,261 रुपये, 14 कॅरेट सोने 47,004 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,211 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान