AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चला मग सोने खरेदीला, इतके उतरले भाव, चांदीत किलोमागे इतकी झाली घसरण

Gold Silver Rate Today 27 March 2024 | गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी उसळी घेतली तर चांदीने पण ग्राहकांना घामटा फोडला होता. किंमतींनी मोठी मजल मारली होती. त्यानंतर दोन्ही धातूंना कमाल दाखवता आली नाही. गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली होती. आता काय आहेत किंमती?

चला मग सोने खरेदीला, इतके उतरले भाव, चांदीत किलोमागे इतकी झाली घसरण
सोने आणि चांदीने घेतली उसळी
| Updated on: Mar 27, 2024 | 8:43 AM
Share

मार्च महिन्यात सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली. सुरुवातीच्या दहा दिवसांत मौल्यवान धातू चमकले होते. तर मध्यंतरी दोन आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने पुन्हा भरारी घेतली. 21 मार्च रोजी कमाल उसळी घेतली. गेल्या आठवड्यात सोन्यात 1500 रुपयांची तर चांदीत 2800 रुपयांची वाढ दिसून आली होती. या आठवड्याची सुरुवात अजून तरी दणक्यात झाली नाही. सोमवार, मंगळवारी किंमतीत पडझड दिसून आली. सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 27 March 2024) आता असा आहे भाव?

सोन्यात पडझड

गेल्या आठवड्यात गुरुवारी, 21 मार्च रोजी 1,000 रुपयांच्य उसळीमुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 67,000 रुपयांच्या घरात पोहचला होता. त्यानंतर भाव उतरले. हा ट्रेंड या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत पण दिसून आला. सोन्यात सोमवारी कोणताच बदल दिसला नाही. तर 26 मार्च रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 61,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउतार

गेल्या आठवड्यात 21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली. त्यानंतर चांदीत नरमाई आली. दुसऱ्याच दिवशी चांदीत 2000 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यात सोमवारी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 26 मार्च रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 66,716 रुपये, 23 कॅरेट 66,449 रुपये, 22 कॅरेट सोने 61,112 रुपये झाले.18 कॅरेट 50037 रुपये, 14 कॅरेट सोने 39,029 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,279रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत