AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 March 2025 : सोन्याची महागाईची गुढी, चांदीने अगोदरच साजरा केला पाडवा, भाव काय आता?

Gold Silver Rate Today 28 March 2025 : सलग दुसर्‍या दिवशी सोन्याने दरवाढ नोंदवली. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला भरते आले आहे. तर दुसरीकडे चांदी पण महागली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 28 March 2025 : सोन्याची महागाईची गुढी, चांदीने अगोदरच साजरा केला पाडवा, भाव काय आता?
सोने आणि चांदीचा भाव कायImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 28, 2025 | 8:34 AM
Share

सोने आणि चांदीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधला. सोन्यात सलग दुसर्‍या दिवशी मोठी वाढ झाली. सोन्याने महागाईची गुढी उभारली. तर दुसरीकडे चांदीने काल एक हजारांची वाढ नोंदवली. आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक मिळाला होता. आता पाडव्याच्या मुहूर्तावर सोने पुन्हा 90 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चांदी अजून लांब पल्ला गाठू शकते. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 28 March 2025 )

सोन्याची महागाईची गुढी

या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी सोने अनुक्रमे 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी सोने 110 रुपयांनी तर गुरूवारी 440 रुपयांनी असे एकूण 550 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 1000 रूपयांची भरारी

21 मार्चपासून चांदी 4100 रुपयांनी स्वस्त झाली. सोमवार, मंगळवारी दोन दिवस किंमती स्थिर होत्या. बुधवारी चांदी 1000 रूपयांनी वधारली. तर गुरुवारी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,417, 23 कॅरेट 88,063, 22 कॅरेट सोने 80,990 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,313 रुपये, 14 कॅरेट सोने 51,724 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 99,775 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?